Rs 2000 Note: 2000 रुपयांची नोट (Rs 2000 notes) चलनातून रद्द करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतला आहे. मात्र, 2000 रुपयांच्या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. आरबीआयच्या आजच्या निर्णयानंतर अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले असतील. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...
Rs. 2000 note: आरबीआयकडून 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय; तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2023 08:52 PM (IST)
Rs 2000 Note: आरबीआयने आज दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले असतील. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...
Rs. 2000 note: आरबीआयकडून 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय; तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर...
NEXT
PREV
Published at:
19 May 2023 08:52 PM (IST)
- 2000 रुपयांच्या नोटा चलनातून का काढल्या जात आहेत?
2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.
सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या "क्लीन नोट पॉलिसी" च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- क्लीन नोट पॉलिसी म्हणजे काय?
- जनतेला चांगल्या दर्जाच्या नोटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हे RBI ने अवलंबलेले धोरण आहे.
- 2000 च्या नोटा चलनात वापरू शकतो का?
- होय. 2000 रुपयांची नोट चलनात वापरू शकतो. या नोटेला कायदेशीर मान्यता आहे.
- 2000 रुपयाच्या नोटा सामान्य व्यवहारांसाठी वापरल्या जाऊ शकतात का?
- होय. लोक त्यांच्या व्यवहारांसाठी 2000 रुपयांच्या नोटा वापरणे सुरू ठेवू शकतात आणि त्या एखाद्या व्यवहारात, मोबदला म्हणून देखील मिळवू शकतात.
- सामन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपये मूल्याच्या नोटांचे काय करावे?
- 2000 रुपयाच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बँकेच्या शाखांशी संपर्क साधू शकतात. खात्यात नोट जमा करण्याची आणि 2000 रुपयाच्या नोटा बदलण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध असेल.
- बँक खात्यात 2000 रुपयाच्या नोटा जमा करण्यासाठी काही मर्यादा आहे का?
- KYC नियम आणि इतर लागू असलेल्या नियमांनुसार बँकेत दोन हजार रुपयांच्या ठेवी जमा करता येऊ शकतात.
- 2000 रुपयाच्या नोटा बदलून दिल्या जाऊ शकतात यावर काही मर्यादा आहे का?
- 2000 रुपयाच्या नोटा एका वेळी 20 हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंत बदलल्या जाऊ शकतात.
- नोट बदलण्याची सुविधा कोणत्या तारखेपासून उपलब्ध होईल?
- 23 मे 2023 पासून बँकेतून 2000 रुपयांची नोट बदलता येऊ शकते.
- बँकेच्या शाखांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँक ग्राहक असणे आवश्यक आहे का?
- नाही. खाते नसलेला व्यक्ती कोणत्याही बँकेच्या शाखेत एकावेळी 20 हजाराच्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -