एक्स्प्लोर

RBI : आरबीआयकडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांचा कालावधी सहा महिने निश्चित करण्यात आला आहे. 

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या कामकाजाचं नियमन केलं जातं. आरबीआयकडून बँका आणि वित्तीय संस्थांच्या कारभाराची वेळोवेळी तपासणी केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ज्या बँका नियमांचं पालन करत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते. काही वेळा नियमांची पूर्तता न केल्यानं आर्थिक दंड केला जातो. तर, काही वेळा बँकांवर निर्बंध घातले जातात. जालन्यामधील एका सहकारी बँकेवर आरबीआयनं निर्बंध घातले आहेत. मोतिराम अग्रवाल जालना मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जालना या बँकेवर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत.  

आरबीआयनं निर्बंध का घातले? 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमन कायदा 1949 चा वापर करत मोतिराम अग्रवाल जालना मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध 10 एप्रिल 2026 ला बँकेचं कामकाज संपल्यापासून लागू झाले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यानं आरबीआयनं हा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं या बँकेवर निर्बंध टाकल्यानं 10 एप्रिलनंतर या बँकेला आरबीआयच्या लेखी परवानगीशिवाय नवी कर्ज देणे, गुंतवणूक करणे, ठेवी स्वीकारणे यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय बँकेस त्यांच्याकडील मालमत्तेची विक्री करणे, देणी देणे यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयनं घातलेल्या निर्बंधांची माहिती बँकेत दर्शनी भागात ठेवीदार, ग्राहकांच्या माहितीसाठी लावण्यात यावी. याशिवाय ही माहिती बँकेच्या वेबसाईटवर देखील द्यावी, असं आरबीआयच्या आदेशात सांगण्यात आलं आहे. 

बँकेकडे सध्या असलेल्या ठेवींपैकी काही रक्कम काढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. मात्र, आरबीआयच्या निर्देशानुसार ठेवींमधील रकमेचा वापर कर्ज भरण्यास करायचा असल्यास करता येऊ शकतो. 

बँकेची आर्थिक स्थिती कमजोर झाल्यानं आरबीआयनं निर्बंध घातले आहेत. ही कारवाई करण्यापूर्वी आरबीआयनं बँकेचे संचालक मंडळ वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बँकेचे कामकाज सुधारण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र, पुरेसे प्रयत्न  झाले नसल्याचं आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ठेवीदारांच्या हितासाठी आरबीआयनं बँकेवर निर्बंध घातल्याचं म्हटलं. 

दरम्यान, डीआयसीजीसीचं 5 लाख रुपयांपर्यंत संरक्षण ज्या ठेवींना आहे, त्या ठेवीदारांनी बँक अधिकाऱ्यांसोबत संपर्क करावा, असं सांगण्यात आलं आहे. आरबीआयनं घातलेल्या निर्बंधानुसार बँकेचं कामकाज सुरु राहील, दरम्यानच्या काळात बँकेला आर्थिक स्थिती सुधारावी लागेल. आरबीआयनं या बँकेवर 6 महिन्यांच्या कालावधीसाठी निर्बंध घातले आहेत. आरबीआयकडून बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय पावलं उचलली जातात यावर लक्ष ठेवलं जाईल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : देवेंद्र फडणवीस यांची भूमिका द्वेषाने भरलेली, मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलंय; मनोज जरांगे पाटील संतापले, पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारणार?
देवेंद्र फडणवीस यांची भूमिका द्वेषाने भरलेली, मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलंय; मनोज जरांगे पाटील संतापले, पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारणार?
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Embed widget