RBI Repo Rate मुंबई : जर तुम्ही घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. येत्या काळात गृह कर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक रेपोरेटमध्ये पुन्हा एकदा कपात करु शकते. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसारडिसेंबरमध्ये होणार्‍या पतधोरणविषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट 25 बेसिसपॉईंटनं कमी केला जाऊ शकतो. त्यामुळं या वर्षाच्या शेवटी रेपो रेट 5.25 टक्के असेल. अलीकडच्या काळात महागाई घटलेली असल्यान आरबीआय पुढील दोन पतधोरणविषयक समितीच्या बैठकीत रेपोरेटमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता नाही.

HSBC च्या रिपोर्टमध्ये दावा

HSBC ग्लोबल रिसर्चच्यारिपोर्टमधीलदाव्यानुसार ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यातील पतधोरणविषयक समितीच्या बैठकीत रेपोरेटमध्ये बदल केला जाणार नाही. आरबीआय डिसेंबरच्यापतधोरणविषयक समितीच्या बैठकीत 25 बेसिसपॉईंटनंरेपोरेटमध्ये कपात करु शकते. त्यामुळं 2025 च्या अखेरपर्यंतरेपो रेट 5.25 टक्क्यांवर येईल.

जूनमध्ये महागाई घटली

जून महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांक आधारित महागाईचा दर मे महिन्यातील 2.8 टक्क्यांवरुन कमी होऊन जूनमध्ये2.1 टक्के झाली आहे. महागाईतील ही घसरण अन्नपदार्धांच्या किंमती कमी झाल्यानं आली आहे. ज्यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. रिपोर्टमधीलदाव्यानुसार2025 च्या दुसऱ्यातिमाहीत सरासरी महागाई दर 2.7 टक्क्यांवर असेल. आरबीआयचा अंदाज 2.9 टक्के असून त्यापेक्षा कमी असेल.

आरबीआय गव्हर्नर काय म्हणाले?

आरबीआयचे मुख्य गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी मंगळवारी सीएनबीसीटीव्ही18 सोबत चर्चा केली. यामध्ये त्यांनी रेपो रेट संदर्भात बोलताना म्हटलं की कमी होणारी महागाई आणि विकासातील मंदी हे रेपो रेटमधील कपातीस जबाबदार असणारे घटक आहेत. पतधोरणविषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट संदर्भात निर्णय घेतला गेल्यास तो महागाई आणि आर्थिक विकासावर आधारित असेल. आरबीआयनं या वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा 0.25 टक्के बेसिसपॉईंटची कपात रेपोरेटमध्ये केली होती. त्यामुळंरेपो रेट कमी होऊन 6.00 टक्क्यांवर आला होता. यानंतर जूनमध्येआरबीआयनंजूनमध्येरेपोरेटमध्ये50 बेसिसपॉईंटची कपात केली होती. त्यामुळंरेपो रेट 5.50 टक्क्यांवर आला होता.