एक्स्प्लोर

RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवला, गृहकर्जावर काय परिणाम होणार? ईमएमआय कमी होणार की वाढणार? जाणून घ्या

Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आज पतधोरण जाहीर करण्यात आलं. आरबीआयनं यावेळी रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. गृहकर्ज सुरु असणारे आणि ज्यांचं गृहकर्ज सुरु आहे, त्या सर्वांचं लक्ष आरबीआयच्या रेपो रेटच्या निर्णयाकडे लागलंहोतं. आता आरबीआयनं रेपो रेट कायम ठेवल्यानं गृहकर्जदारांमध्ये स्थिरतेची भावना निर्माण होऊ शकते. यामुळं गृह कर्जाचे व्याज दर देखील स्थिर राहू शकते. यामुळं गृहकर्ज ज्यांना घ्यायचंय ते त्यांचं आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करु शकतात. 

RBI Repo Rate : रेपो रेट कायम,  गृहकर्जावर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यांच्या पतधोरण विषयक समितीनं रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय एकमतानं घेतला. आरबीआयनं निश्चित केलेल्या मर्यादेत महागाई असल्यानं आणि जागतिक आव्हानं असूनही आर्थिक वाढ स्थिर असल्यानं रेपो रेट स्थिर ठेवल्याचं आरबीआयनं म्हटलं.  

गृहनिर्माण उद्योग आणि हाऊसिंग मार्केटसाठी स्थिर व्याज दर ही चांगली बाब आहे. जेव्हा कर्जासाठीच्या खर्चाचा अंदाज लावता येतो तेव्हा अधिक लोक गृहकर्ज घेण्यासंदर्भात विश्वासानं निर्णय घेतात. 

आरबीआय रेपो रेट दर स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळं अल्पकालीन दिलासा मिळतोय. पुढील काळात रेपो रेट कसा राहणार की नाही हे महागाईची स्थिती, जागतिक आर्थिक परिस्थिती यावर आधारित असेल. महागाई नियंत्रणात राहिली तर आरबीआयला रेपो रेट कमी करण्यासारखी स्थिती दिसून येईल. रेपो रेट कमी केल्यास कर्जाचा खर्च कमी होईल.

सध्या रेपो रेट स्थिर राहिल्यानं गृहकर्जाचा ईएमआय स्थिर राहिल. गृहकर्ज घेण्याचा जे विचार करत आहेत त्यांच्यासाठी कर्ज घेण्यासाठी चांगली वेळ आहे. 

रेपो रेटमध्ये वर्षभरात 125  बेसिस पॉईंटची कपात

गेल्या वर्षी फेब्रुवारी 2025 पूर्वी रेपो रेटचा दर 6.50 टक्के होता. मागील एका वर्षात एकूण 125 बेसिस पॉइंट्स दरकपात केली आहे. आरबीआयनं रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला आहे. सोबतच, आरबीआय पुढील सवलतींचा विचार करण्यापूर्वी वेट ॲंड वॉचची भूमिका स्वीकारण्याची शक्यता आहे. 

फेब्रुवारीतील एमपीसी बैठक केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारत- अमेरिका, भारत-युरोपियन यूनियन यांच्यातील महत्त्वपूर्ण व्यापार करारानंतर पार पडली. या दोन्ही घडामोडींचा आर्थिक वाढीवर आणि महागाईच्या समीकरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आरबीआयनं रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला आहे.डिसेंबर महिन्यात आरबीआयकडून रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सनं कपात करत तो 5.25 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gold Price: इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget