एक्स्प्लोर

RBI चा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली, आता हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार कर्ज 

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होणार आहे.  शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी कर्जाच्या मर्यादेत RBI ने वाढ केली आहे.

Agricultural News RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळाला आहे.  शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी कर्जाच्या मर्यादेत RBI ने वाढ केली आहे. विशेष म्हणजे हमीमुक्त कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे. कृषी कर्जाची मर्यादा 1 लाख 60 हजारांवरुन 2 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती RBI ने दिली आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय 

महागाई आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा  1 लाख 60 हजारांवरुन 2 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आपल्या शेवटच्या पतधोरणात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वाढत्या महागाईपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आता हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे. सध्या ही मर्यादा 1.6 लाख रुपये आहे. याआधी, सलग 11व्यांदा RBI ने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच रेपो दर 6.5 टक्के राहील. दुसरीकडे, सरकारने रोख राखीव प्रमाण 4 टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे देशातील बँकांना 1.15 लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

 परिपत्रक जारी 

दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाई आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जाची मर्यादा 2 लाख करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल, असे ते म्हणाले. 2010 मध्ये आरबीआयने कृषी क्षेत्राला कोणतीही हमी न देता 1 लाख रुपये देण्याची मर्यादा निश्चित केली होती. नंतर 2019 मध्ये ते 1.6 लाख रुपये करण्यात आले. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 


RBI चा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली, आता हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार कर्ज 

रेपो दरात कोणताही बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग 11व्यांदा पतधोरणात कोणताही बदल केला नाही. तो 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मात्र, अर्थव्यवस्थेत रोख वाढवण्याच्या उद्देशाने मध्यवर्ती बँकेने सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) 4.5 टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला. या पावलामुळे बँकांमध्ये 1.16 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. CRR अंतर्गत, व्यावसायिक बँकांना त्यांच्या ठेवींचा एक विशिष्ट भाग केंद्रीय बँकेकडे रोख राखीव म्हणून ठेवावा लागतो. यासोबतच सध्याची परिस्थिती पाहता आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दराचा अंदाज 7.2 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांवर आणला आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षातील किरकोळ महागाईचा अंदाज 4.5 टक्क्यांवरून 4.8 टक्के केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, विक्रीसाठीच्या मॉईश्चरची अट शिथिल; राज्य कृषी मूल्य आयोगचा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : एलन मस्क बनला जगातील पहिला ट्रिलियनेअर, SpaceX चा एक शेअर किती रुपयांना? गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी
Elon Musk : एलन मस्क बनला जगातील पहिले ट्रिलियनेअर,SpaceX चा एक शेअर किती रुपयांना?
हिताची ग्रुप कंपनी 2000 कोटींची गुंतवणूक करणार, गुजरातमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर उत्पादन सुविधा देणार
हिताची ग्रुप कंपनी 2000 कोटींची गुंतवणूक करणार, गुजरातमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर उत्पादन सुविधा देणार
A-1 Limited : 10 रुपयांपेक्षा कमी पेनी स्कॉकला अप्पर सर्किट; सोलर ग्रुपसह तीन मोठ्या कंपन्यांसोबत 35 कोटींचा करार
10 रुपयांपेक्षा कमी पेनी स्कॉकला अप्पर सर्किट; सोलर ग्रुपसह तीन मोठ्या कंपन्यांसोबत 35 कोटींचा करार
सरकारी मालकीच्या IFCI शेअरचा धुमाकूळ, 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट; NSE IPO च्या घोषणेने उच्चांक!
सरकारी मालकीच्या IFCI शेअरचा धुमाकूळ, 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट; NSE IPO च्या घोषणेने उच्चांक!

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : भारताच्या जहाजावरील हल्ल्यात तीन निष्पाप भारतीयांचा मृत्यू, ट्रम्प यांची इराणवर आरोपांची तोफ, अखेर अमेरिकेला इराणनं आरसा दाखवला
इराणच्या ड्रोनकडून भारताच्या जहाजावर हल्ला, ट्रम्प यांचा अजब दावा, इराणनं सर्व आरोप फेटाळले 
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget