नवी दिल्ली : देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने देशातील अनेक कर्जबुडव्यांची कर्ज माफ केली आहेत. रिझर्व्ह बँकेकडून जवळपास 50 कर्जदारांची 68607 कोटींची कर्ज बँकांकडून माफ करण्यात आली आहेत. यामध्ये हिरे व्यापारी असलेल्या कर्जबुडव्या मेहुल चोक्सी, विजय माल्या यांच्यासह अनेक मोठ्या कर्जदारांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेकडून माहिती अधिकारांतर्गत देण्यात आलेल्या उत्तरातून ही माहिती उघड झाली आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर 2019 अखेर ही कर्ज माफ करण्यात आल्याचं सांगितलं आहे.


सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे. याआधी राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्यात केला होता. मात्र त्यावेळी केंद्र सरकारने यासंदर्भातील कोणतीही माहिती उघड करण्यास नकार दिला होता. दरम्यान, आरबीआयने या सर्वांची कर्ज 30 सप्टेंबर 2019 ला माफ केल्याची कबुली दिली आहे.


टॉप कर्जबुडव्यांची यादी :




  • मेहुल चोकसी, गिंतांजली जेम्स लिमिटेड : 5492 कोटी

  • संदिप झुनझुनवाला, आरईआय अॅग्रो : 4314 कोटी

  • जतिन मेहता, विन्सम डायमंड : 4076 कोटी

  • कोठारी बंधू, रोटोमॅट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड : 2850 कोटी

  • विजय मल्ल्या, किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड : 1943 कोटी

  • कुडोस केमी : 2326 कोटी

  • पतंजली आयुर्वेद, रूचि सोया इंडस्ट्रिज : 2212 कोटी

  • झूम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड : 2012 कोटी


सदर प्रकरणी बोलताना सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले म्हणाले की, जी माहिती उघड करण्यास सरकारने नकार दिला, त्याचा खुलासा करत आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक सुचना अधिकारी अभय कुमार यांनी शनिवारी 24 एप्रिल रोजी उत्तर उपलब्ध करून दिलं. ज्यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने 16 डिसेंबर 2015मध्ये दिलेल्या निर्णयाचा हवाला देत परदेशी कर्जधारकांबाबत कोणतीही माहिती उघड करण्यास नकार दिला आहे.


रिझर्व्ह बँकेकडून ज्या 50 कर्जदारांची कर्ज माफ करण्यात आली आहेत. त्यांमध्ये मेहुल चोकसीची कंपनी गितांजली जेम्स लिमिटेड सर्वात पुढे असून त्याच्यावर 5492 कोटी रूपयांचं कर्ज आहे. तर इतर सामूहिक कंपन्यांनी, गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रँड लिमिटेड यांच्याही समावेश आहे. ज्यांनी क्रमशः 1447 कोटी रूपये आणि 1109 कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं.


संबंधित बातम्या :


Coronavirus | कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी RBI कर्मचाऱ्यांचा पुढाकार; 7.30 कोटी पीएम केअर फंडसाठी देणार


Jio-Facebook करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

YES BANK | घाबरण्याचं कारण नाही, तुमचे पैसे सुरक्षित; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आश्वासन