Continues below advertisement

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टॉक्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. रेल्वेच्या फायनान्समधील सुधारणांच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. 26 डिसेंबर 2025 ला भारतीय रेल्वेनं प्रवास भाड्यात वाढ केली आहे.रेल्वेच्या भाडेवाढीमुळं रेल्वे आर्थिक शिस्तीच्या दिशेनं पाऊल टाकत असल्याचं मानलं जातंय. गुंतवणूकदारांच्या मते रेल्वेचा अंतर्गत कॅश फ्लो चांगला होईल. आधुनिकीकरण, आधुनिकीकरण, प्रवासी क्षमता वाढीसंदर्भात अपेक्षा आहेत. कवच, वंदे भारत स्लीपर ट्रेनं यासंदर्भातील कामांमुळं रेल्वेचे स्टॉक चर्चेत आहेत.

IRFC

सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसी ही रेल्वेची वित्तीय शाखा आहे याचं काम रोलिंग स्टॉक आणि इन्फ्रास्ट्रक्चर असेटसला दीर्घकालीन लीज द्वारे वित्त पुरवठा करणं हे आहे. याचं बिझनेस मॉडेल साधं, स्थिर आणि कमी जोखमीचं मानलं जातं.

Continues below advertisement

आयआरएफसीचा शेअर शुक्रवारी 2.41 टक्क्यांनी कमी होत 121.27 रुपयांवर पोहोचला आहे. हा स्टॉक गेल्या एक महिन्यात 7.04 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र एका वर्षाचा विचार केला असता हा स्टॉक 5.58 मायनस आहे.

रेल विकास निगम लिमिटेड

सार्वजनिक क्षेत्रातील रेल विकास निगम लिमिटेड म्हणजे आरव्हीएनएल ही रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसटी एक्जीक्यूशनं कंपनी आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 3 टक्क्यांच्या घसरणीसह 333 रुपयांवर बंद झाला आहे. हा स्टॉक गेल्या महिन्यात 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षात आरव्हीएनएलच्या शेअरनं 957.05 टक्के रिटर्न दिला आहे.

आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुकिंग,केटरिंग, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि पर्यटने सेवा सांभाळली जाते. आयआरसीटीसीचा शेअर 2.36 टक्क्यांनी घसरुन 640.95 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या एक वर्षात 14.18 टक्क्यांनी घसरण झाली. तर, पाच वर्षात या स्टॉकनं 122.37 टक्के परतावा दिला आहे.

RITES ही एक वाहतूक ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर कन्सलटन्सी कंपनी आहे. जी रेल्वे हाईवे, पोर्टस आणि अर्बन इन्फ्रास्ट्र्क्चर मध्ये काम करते. कंपनीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात कन्सलटन्सी आणि प्रकल्प व्यवस्थापन येथून येतं. RITES चा शेअर शुक्रवारी 232.29 रुपयांवर होता. एका महिन्यात स्टॉक 2.83 टक्क्यांनी वाढला आहे.

Texmaco Rail and Engineering कंपनी फ्रेट वॅगन, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि कास्टिंग्जमध्ये काम करते. कंपनीचा शेअर शुक्रवारी 127 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या सहा महिन्यात हा स्टॉक 22.56 टक्क्यांनी घसरला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)