India US trade talksनवी दिल्ली: भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातीलटॅरिफ संदर्भातील चर्चेवर मत मांडलं आहे. रघुराम राजन यांनी अमेरिकन थिंकटँकDeKoderला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की भारताला अमेरिकेसोबतसुरु असलेल्या व्यापारी कराराच्या चर्चेत आपलं टॅरिफ10 ते 20 टक्क्यांमध्ये ठेवण्याचं धोरण ठेवलं पाहिजे. अमेरिकेला असं कोणतंही आश्वासन भारतानं देऊ नये जे पूर्ण करणं अवघड होऊ शकतं, असं राजन म्हणाले.

भारत आणि अमेरिका यांच्यातसुरु असलेल्या व्यापार कराराच्या चर्चांकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलं आहे. यातील 25 टक्के टॅरिफ भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं लावण्यात आलं होतं. बाजार जाणकारांच्या मते यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Raghuram Rajan on Tariff : रघुराम राजन काय म्हणाले?

अमेरिकन थिंकटँकDeKoder सोबत चर्चा करताना रघुराम राजन म्हणाले की भारतानंटॅरिफचीटक्केवारी10 ते 20 टक्क्यांमध्ये ठेवावी. भारतानं जपान आणि यूरोपियनदेशांसारखं अशी कोणतीही आश्वासन देऊ नये ज्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्यात नुकसान होऊ शकेल. रघुराम राजन यांच्या मते व्यापारी करारासंदर्भातीलटॅरिफ चर्चा झिरोटॅरिफच्या स्तरावर पोहोचली तर ते देशासाठी फायदेशीर ठरेल.

भारतानं त्यांचे प्रतिस्पर्धी देशांच्या मागं न राहण्याची दक्षता घेतली पाहिजे. अमेरिकेसोबत पूर्व आणि दक्षिण आशियातील काही देश 19 टक्के टॅरिफवरसहमत झाली आहेत. विकसित देशांचा विचार केला तर यूरोपियन देश आणि जपानचा विचार केला तर त्यांनी 15 टक्क्यांवर सहमती दर्शवली आहे. रघुराम राजन यांनी या सर्व गोष्टींचा विचार कता भारताला अमेरिकेसोबतचाटॅरिफचा टप्पा 10 ते 20 टक्क्यांदरम्यान ठेवावं असं म्हटलं.

भारत-अमेरिकेत व्यापारी चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. याशिवाय भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ देखील ट्रम्प यांनी लादलं आहे. भारतातून अमेरिकेत आयातहोणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफआकारलं जातं. ज्यामुळं भारतीय वस्तूंची अमेरिकन बाजारातील मागणी घटण्याची शक्यता आहे. या दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचं शिष्टमंडळ अमेरिकेचा दौरा करुन परतलं आहे.

दोन्ही देशांकडून व्यापार कराराबाबतच चर्चा सकारात्मक असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. अमेरिका भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवावी अशी भूमिका घेत आहे. मात्र, भारतानं देशातील ग्राहकांचं हित लक्षात घेत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं. काही कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे.