Raghav Chadha Net Worth : देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आम आदमी पार्टीचे 10 पैकी 7 खासदार भाजपमध्ये दाखल होणापर आहेत. यामध्ये राघव चड्ढा यांचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरुन हटवलं होतं. आज राघव चढ्ढा यांनी आम आदमी पार्टीपासून दूर जात जनतेकडे जात आहे, असं म्हटलं आहे. राघव चढ्ढा हे राजकारणी असण्यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती देखील आहेत. दरम्यान, तुम्हाला राघव चढ्ढा यांची संपत्ती किती आहे? याबाबत माहिती आहे का? जाणून घेऊयातक सविस्तर माहिती.
राघव चढ्ढा हे राजकारणी असण्यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती देखील आहेत. या जोडप्याचा विवाहसोहळा 24 सप्टेंबर 2023 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडला, ज्यात केवळ कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. चला, त्यांच्या एकूण संपत्तीवर नजर टाकूया.
राघव चढ्ढा यांची एकूण संपत्ती किती?
2022 मध्ये राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर, राघव चड्ढा यांनी अंदाजे 37 लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली. यात एक मारुती स्विफ्ट डिझायर कार, 30000 रोख रक्कम आणि 6 लाख किमतीचे शेअर्स यांचा समावेश होता. या काळात त्यांनी घर किंवा जमीन यांसारख्या कोणत्याही स्थावर मालमत्तेचा खुलासा केला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात, त्यांची एकूण जंगम मालमत्ता केवळ 16 लाख)असल्याचे नमूद केले होते. त्यावेळी त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न 2.19 लाख असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार राघव चड्ढाची एकूण संपत्ती 50 लाख रुपये आहे. यामध्ये दिल्लीतील 36 ते 37 लाख रुपयांच्या घराचा समावेश आहे. तसेच, त्याच्या बँक खात्यात 30 हजार ते 40 हजार रुपये असल्याचेही म्हटले जाते. याशिवाय, अहवालानुसार त्याच्याकडे शेअर्स, बॉण्ड्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये 6 लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक आहे. त्याच्याकडे अंदाजे 90 ग्रॅम सोने देखील आहे, ज्याचे सध्याचे मूल्य अंदाजे 13 लाख रुपये आहे.
परिणीती चोप्राची एकूण संपत्ती किती?
परिणीती चोप्राची एकूण संपत्ती राघव चड्ढापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे, तिचा मासिक पगार अंदाजे 13 लाख रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्रीची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तिच्या मालकीचे वांद्रे येथे अंदाजे 22 कोटी रुपयांचे एक आलिशान घर आहे. याशिवाय, तिच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्यांचा संग्रह देखील आहे. परिणीती चोप्राकडे 1.30 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वोग, 43.19 कोटी रुपयांची ऑडी क्यू4 आणि 69.27 लाख रुपयांची ऑडी क्यू7 यांसारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. परिणीती चोप्रा दरमहा 40 लाख रुपये कमावते. इतकेच नाही, तर ती एका चित्रपटासाठी सुमारे 5 कोटी रुपये मानधन घेते असेही म्हटले जाते.