Pwc Layoffs 2024 : जगभरातील विविध कंपन्यांमध्ये (company) सध्या नोकरकपात (Layoffs) सुरु आहे. वाढता खर्च आणि मंदीच वातावरण यामुळं कंपन्या कर्मचारी (Employees) कमी करण्यावर भर देत आहेत. अशातच  PwC या कंपनीनं मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीने तब्बल 1800 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात (wall street journal report) याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 


15 वर्षात पहिल्यांदाच कंपनीने कर्मचाऱ्यांना काढून टाकले


अहवालात दिलेल्या माहितीनुसार PwC कंपनीने 1800 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.  ही सर्व टाळेबंदी अमेरिकेत केली जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच कंपनीने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. PwC च्या या घोषणेचा अनेक विभागांवर परिणाम होईल. व्यवस्थापकीय संचालक, बिझनेस सर्व्हिस ऑडिट, असोसिएट्स आणि कर विभागातील कर्मचाऱ्यांना या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. या छाटणीच्या माध्यमातून कंपनी अमेरिकेत काम करणाऱ्या 2.5 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनी ऑक्टोबर 2024 पर्यंत कामगार कमी करण्याचे काम पूर्ण करू शकते.


कंपनीच्या हितासाठी निर्णय आवश्यक 


PwC अमेरिकेचे अध्यक्ष पॉल ग्रिग्ज यांनी या प्रकरणावर एक मेमो जारी केला आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या अगदी लहान वर्गावर परिणाम होईल. हा निर्णय नेहमीच कठीण असतो, परंतु कंपनीच्या हितासाठी आवश्यक असतो. 2009 नंतर कंपनीने टाळेबंदीचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.


कंपनीची पुनर्रचना करण्यावर भर


PwC ने मागील 15 वर्षांमध्ये त्यांच्या सेवांना कमी मागणीमुळे टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या पुनर्रचना योजनेबद्दल माहिती देताना, पॉल ग्रिग्स यांनी त्यांच्या मेमोमध्ये म्हटले आहे की, आमच्या भविष्यातील योजनांवर काम करताना आम्ही कंपनीच्या संघांची पुनर्रचना करत आहोत. या कारणास्तव आम्ही अनेक संघांमध्ये टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षात घेण्याजोगा आहे की कंपनीचा हा निर्णय अनेक अर्थाने आश्चर्यकारक आहे. कारण त्याच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या अर्न्स्ट अँड यंग (EY), Klynveld Peat Marwick Goerdeler (KPMG आणि Deloitte) प्रमाणे गेल्या 15 वर्षात एकही छाटणी केलेली नाही. मात्र आता हा निर्णय कंपनीला घ्यावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. यामध्ये अॅपल, टाटा, रिलायन्ससारख्या कंपन्यांचा देखील समावेश आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Apple Layoffs : Apple कंपनीचं कठोर पाऊल, एकाच वेळी 100 कर्मचाऱ्यांना नारळ, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दणका