Govt Yojana : केंद्र सरकार (Central Govt) आणि विविध राज्य सरकारे सामान्य नागरिकांसह महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत. पंजाब सरकारनं (Punjab Govt) मुलींसाठी अशीच एक योजना आखली आहे. आशीर्वाद योजना (Asairavaada yaojana) असं पंजाब सरकारनं सुरु केलेल्या योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत पंजाब सरकारकडून मुलींना 51,000 रुपयांची जास्तीत जास्त आर्थिक मदत दिली जाते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारनं (Punjab govt) 1997 मध्ये शगुन योजना या नावानं ही योजना सुरु केली होती. त्यानंतर या योजनेचं नाव बदलून आशीर्वाद योजना (Asairavaada yaojana) असं ठेवण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 1997 मध्ये मुलींना 5100 रुपयांची मदत दिली जात होती. त्यानंतर या योजनेमध्ये हळूहळू वाढ करण्यात आली. 2004 योजनेची रक्कम 6100 रुपये, त्यानंतर 2006 मध्ये ही रक्कम 15,000 रुपये करण्यात आली. 2017 मध्ये 21,000 रुपये आणि नंतर 2021 मध्ये 51,000 रुपये करण्यात आली होती. दरम्यान, ही आशिर्वाद योजना पंजाबमध्ये मोठी लोकप्रिय आहे.
कोणत्या मुलींना मिळतो या योजनेचा लाभ?
मिळालेल्या माहितीनुसार, या आशिर्वाद योजनेचा लाभ SC, OBC आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS) श्रेणीतील मुलींना मिळतो. मुलींच्या लग्नासाठी ही आर्थिक मदत दिली जाते. तसेच विधवा, अनुसुचित जातीच्या महिलांच्या पुनर्विवाहाच्या वेळी देखील 51000 रुपयांची मदत दिली जाते. गरजू कुटुंबातील दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता काय?
दरम्यान, आशिर्वाद योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक पंजाबचा नागरिक असणे गरजेचे आहे. तसेच तो मागावर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असावा. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 32,790 रुपयांपेक्षा जास्त नसावे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटला https://ashirwad.punjab.gov.in/ भेय देऊ शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
लग्न तपशील
आधार कार्ड
बीपीएल कार्ड (जर बीपीएल श्रेणीतील)
जन्म प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेशी संबंधित इतर दस्तऐवज
जात प्रमाणपत्र
कायम रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते विवरण
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
आशीर्वाद योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची पुर्तता करणं गरजेचं आहे. ही कागदपत्रे असल्यासं मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या: