Precious Stone News : आयुष्यभर एका वृद्ध आजीबाईंच्या  (old grandmother) दारात पडून असलेला दगडाची किंमत कोणालवाच समजली नाही. घरात दरवाज्याला अडसर म्हणून या वृद्ध महिलेनं जीवनभर दगडाला सांभाळलं. पण तिच्या मृत्यूनंतर हा दगड कोट्यावधींची रुपये किमतीचा अंबर दगड (crores rupees stone)  असल्याचे समोर आले. रोमानिया सरकारने जेव्हा या दगडाचे आकलन केले तेव्हा या अंबर दगडाची किंमत 9 कोटी रुपये असल्याचे समोर आले.


आजीबाईंनी दगडाचा तुकडा समजून घराच्या उंबरठ्यावर ठेवला


रोमानिया देशात राहणाऱ्या एका वृद्ध आजीबाईंच्या आयुष्यात आपल्या घरात पडून असलेला दगड किती किमती आहे? त्याची किंमत काय? हे कधीच कळू शकलं नाही. घरात दरवाज्याला अडसर म्हणून हे वृद्ध महिला ज्या दगडाला जीवनभर सांभाळत आली तो त्याच्या मृत्यूनंतर कोट्यावधींची रुपये किमतीचा अंबर दगड असल्याचे वास्तव समोर आले. रोमानीयातील ही आजीबाई या अंबर दगडाला फक्त साधारण दगडाचा तुकडा असल्याचं समजून घराच्या उंबरठ्यावर ठेवत होती. विशेष म्हणजे या वृद्ध महिलेच्या घरी एकदा चोरी सुद्धा झाली होती. मात्र तिच्या घरी पडून असलेला कोट्यावधींचा हा अंबर दगड चोरांच्या लक्षात सुद्धा आला नाही. ते चोर सुद्धा आजीबाई सारखेच या किमती रत्नाची पारख करु शकले नव्हते. 


जगात सर्वात जास्त किंमत असलेला बहुमूल्य अंबर धातू 


सोन्या चांदी खरी पारख ही ही फक्त सोनारालाच कळते अशी एक म्हण आहे. ही म्हण रोमानिया तंतोतंत खरी ठरली आहे. कारण, आजीने ज्याला दगड समजून दरवाजा रोखण्यासाठी वापरले. तो मात्र मुळात जगात सर्वात जास्त किंमत असलेला बहुमूल्य अंबर धातू निघाला.


नदीच्या किनाऱ्यावर सापडला होता हा दगड  


जगासमोर ही महत्वपूर्ण माहिती रोमानिया सरकार आणि स्पेनमधील स्पेनिश भाषेतील वृत्तपत्र एल पाईसने समोर आणली. या माहितीनुसार या वृद्ध महिलेच्या घरी त्याच्या मृत्यूनंतर आढळलेला या अंबर धातूच्या या दगडाची अर्थातच बहुमूल्य रत्नाची किंमत 9 कोटी 13 लाख रुपये असल्याचे समजले.  रोमानिया मध्ये कोल्टि गावात आपल्या कुटुंबासह ही वृद्ध महिला राहत होती .या वृद्ध महिलेला हा अंबर दगडाचा तुकडा कोल्टी गावाजवळ वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यापाशी मिळाला होता. काहीसा पिवळा,चमकीले  असलेला हा दगड तिने आपल्या घरात आणला होता. हा दगड ती दरवाजाचा अडसर म्हणून त्याला वापरत होती.


मौल्यवान धातू आहे हे कसं समजलं?


बहुमूल्य किमंत असलेला हा अंबर धातू वृद्ध महिले्च्या मृत्यूनंतर समोर आला. तिच्या एका नातेवाईकाची नजर घराचा दरवाजा रोखणाऱ्या त्या दगडावर पडली. त्याला हा दगड आकर्षक वाटल्याने थोडा संशय आला. मग त्याने खात्री केल्यानंतर कळाले की, हा बहुमूल्य अंबर धातू आहे. त्या नातेवाईकाने हा अंबर दगड नंतर आपल्या रोमानिया सरकारला विकून कोट्यावधींचे डॉलर मिळवले आहेत . 


रोमानियाने केला राष्ट्रीय खजाना घोषित


रोमानिया सरकारने हे अंबर राष्ट्रीय खजाना म्हणून घोषित केला आहे. त्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी पोलंड येथील क्राकोव इतिहास संग्रहालयात या दगडाला पाठवला होता. पोलंडच्या तज्ज्ञांनी या तुकड्याचा सखोल अभ्यास करुन हे अंबर 38.5 ते 70 मिलियन वर्षे जुना असल्याचं स्पष्ट केले.


महत्वाच्या बातम्या:


Ram Mandir : कृष्ण शिलेपासून साकारलीय प्रभू रामाची बालस्वरुपातील मूर्ती, 'या' काळ्या रंगाच्या दगडाची खासियत माहितीय?