Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : नवीन वर्षाच्या आगमनासोबतच, शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 16व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.  परंतु, आता PM किसानच्या 16व्या हप्त्याबाबत शेतकर्‍यांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी 16 वा हप्ता जारी करणार आहे. यासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे. मात्र, याआधी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणं आवश्यक आहे, अन्यथा पीएम किसानच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता.


 15 नोव्हेंबरला PM किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला होता. विशेष म्हणजे सरकारने आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी केले आहेत.


फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 16 वा हप्ता मिळणार


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. विशेष म्हणजे हे रुपये प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान प्रकारांमध्ये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत केंद्र सरकारनं PM किसानचे 15 हप्ते जारी केले आहेत. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. असे म्हटले जाते की केंद्र सरकार फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 16 वा हप्ता जारी करू शकते. जेणेकरुन शेतकरी पीएम किसानच्या रकमेसह पिकांची वेळेवर पेरणी करु शकतील.


'या' नंबरवर कॉल करा


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला होता. विशेष म्हणजे सरकारनं आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी केले आहेत. याचा फायदा 11 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. जर शेतकऱ्यांना पीएम किसानशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करायचे असेल तर ते pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. त्याच वेळी, सरकारने पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 जारी केला आहे. याद्वारे देखील शेतकरी कॉल करुन संपर्क साधू शकतात. पीएम किसानशी संबंधित माहिती मिळवू शकतात.


याप्रमाणे ई-केवायसी पूर्ण करा


सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही ई-केवायसी पूर्ण न केल्यास आणि तुमच्या जमिनीची पडताळणी न केल्यास तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला ई-केवायसी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे उजव्या बाजूला e-KYC चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर तुम्हाला आधारशी लिंक केलेला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. आता तुम्ही Get OTP वर क्लिक करू शकता. मग तुम्ही ओटीपी टाकताच तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.


महत्त्वाच्या बातम्या:


PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर