Post Office Scheme : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Invest) करणं गरजेचं आहे. मात्र, गुंतवणूक करताना दोन गोष्टींचा प्रामुख्यानं विचार केला जातो. एक म्हणजे आपण गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षीत आहे का? आणि दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करतोय, त्या योजनेतून आपल्याला किती परतावा मिळेल? या गोष्टींचा विचार करुनच गुंतवणूक केली जाते. चांगला परतावा मिळणाऱ्या योजनेत गुंतवणूक केल्यास त्याचा मोठा फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल आज माहिती सांगणार आहोत, या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा मिळणार आहे. 


तुम्ही पैशीचं योग्य नियोजन आणि गुंतवणूक केली तर तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही फक्त 5 वर्षात मोठा फंड गोळा करु शकता. त्याच्या व्याजातून तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकतो. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ देखील मिळवू शकता. यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.


कसा मिळवाल मोठा नफा?


पोस्टाच्या योजनेत तुम्ही 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकता. यातून वेगवेगळ्या वर्षांसाठी वेगवेगळे रिटर्न मिळतात. तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.8 टक्के परतावा मिळेल. तर 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर 6.9 टक्के परतावा दिला जातो. त्याचप्रमाणे 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के परतावा मिळतो. 


 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळणार?


समजा तुम्ही 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये टाईम डिपॉझिटमध्ये गुंतवले आहेत. आता त्यावर 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर म्हणजेच 5 वर्षांनी तुम्हाला 724149 रुपये मिळतील. ज्यामध्ये 5 लाख रुपये तुमची गुंतवणूक आहे आणि उर्वरित तुमचे व्याज उत्पन्न आहे. यामध्ये तुम्हाला ते आणखी एकदा वाढवण्याची सुविधाही मिळते. जर तुम्ही ते आणखी 5 वर्षे वाढवले ​​तर तुम्ही मॅच्युरिटीवर 10,00,799 रुपये कमवू शकता.


महत्वाच्या बातम्या:


Foreign Currency : देशाच्या परकीय गंगाजळीत वाढ! परकीय चलनसाठ्यात 616.73 अब्ज डॉलरवर