Petrol Diesel Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी जास्त होत आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) कमी होत नाहीत. नेमके दर का कमी होत नाहीत? या प्रश्नाने सर्वसामान्य जनता चिंतेत आहेत. मात्र, राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहेत. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार नाही, असं म्हणता येणार नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या आधी दरात कपात होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. लिटरमागे किमान 2 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात चढ उतार 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात प्रति पिंप 70 डॉलरच्या खाली घसरले आहे. डिसेंबर 2021 नंतर प्रथमच तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र, एक दोन दिवसानंतर पुन्हा तेलाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली आहे. सध्या दरात चढ उतार सुरुच आहे. त्यामुळं देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. 


दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत


लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात पेट्रोल डिझेलच्या दरात झालेली कपात वगळता गेल्या दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील का? असा प्रश्न विचारला असता अधिकाऱ्याने यावर बोलणे टाळले. पण दर कमी होमार नाहीत, असे म्हणता येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती रुपयांची कपात होणार?


दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपुर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची आशा व्यक्त केली जातेय. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याचा अंदाज आहे. पण पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती कपात होणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तर या दोन्हीमध्ये प्रत्येकी 2 रुपयांची घसरण होणार असल्याचंही बोललं जात आहे. 


भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 87 टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून आहे. अशा स्थितीत भारत आता भारत कच्च्या तेलाची जास्तीत जास्त खरेदी करण्यास तयार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


पेट्रोल-डिझेल होऊ शकते स्वस्त, सामान्यांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार? जाणून घ्या सरकारचे नियोजन काय?