नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम पाठवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. 2 ऑगस्ट रोजी 9.70 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20500 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीएस किसान सन्मान निधीचे पैसे आलेले नाहीत. पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून पीएम किसान सन्मान निधी योजना चालवली जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर कोणती लाभार्थी योजनेतून वगळण्यास पात्र ठरू शकतात याबाबत माहिती दिली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटनुसार याबाबत प्रत्यक्ष पडताळणी होईपर्यंत अस्थायी रुपयात त्यांचा लाभ रोखण्यात आल्याची माहिती दिली.
प्रमुख कारणं
पीएम किसान सन्मान निधी योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमीन खरेदी केली असेल, ते या योजनेस पात्र नसतील. याशिवाय एकाच कुटुंबातील एक पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल. उदा. पती पत्नी, वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलं यांनी लाभ घेणे.
चुकीची माहिती
आधार कार्ड, बँक खाते किंवा जमीन रेकॉर्ड यामध्ये फरक असल्याचं दिसून आल्यानं देखील पीएम किसानचा लाभ थांबवला जाऊ शकतो. पीएम किसानच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागेल.
पीएम किसान सन्मान निधी स्टेटस कसं तपासायचं?
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळालेल नाहीत ते शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पीएम किसान वेबसाईटवर Know Your Status वरुन पेमेंट स्टेटस तपासता येईल. पीएम किसान मोबाईल अॅप आणि किसान ई-मित्र चॅटबॉट वरुन देखील पेमेंट स्टेटस तपासू शकता.
पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास कल्याण मंत्रालयाकडून चालवली जाते. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरमहा 6000 रुपये एका वर्षात दिले जातात. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना 20 हप्त्यांचे प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणं 40 हजार रुपये मिळाले आहेत.