13th Installment of PM Kisan Yojana:  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 12 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही 13 वा हप्ता जमा (13th Installment of PM Kisan Yojana) झाला नाही. तुम्हाला पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. ही शंका दूर करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर लॉगिन करून एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. 


जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (पीएम किसान योजना पात्र) लाभार्थी असाल, तर तुम्हाला केंद्र सरकारकडून वार्षिक 6 हजार रुपये दिले जातील. 6000 रुपयांची ही रक्कम चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जाईल. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनाच दिला जातो. मात्र, जर शेतकरी करदाता असेल तर त्याला पीएम किसान योजनेचा लाभ दिला जात नाही.


असे पाहा पीएम किसान योजनेचे स्टेट्स 


13व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात येतील की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला Former Corner चा पर्याय दिसेल. आता तुम्ही त्यातील लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक नमूद करावा लागेल. 


या शब्दांचा अर्थ जाणून घ्या 


त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. सबमिट बटणावर क्लिक करताच तुमची स्टेटस माहिती तुमच्यासमोर उघडेल. जर तुमच्या स्टेटसमध्ये YES लिहिले असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, पण NO लिहिले असेल तर PM किसान योजनेचा 13 वा हप्ता दिला जाणार नाही.


13 व्या हप्त्याचा लाभ का मिळणार नाही?


या योजनेअंतर्गत पात्र नसलेल्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 13 वा हप्ता दिला जाणार नाही. यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत ईकेवायसीही केलेले नाही, त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. याशिवाय अर्जात कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पीएम किसान योजनेचा 13वा हप्ताही दिला जाणार नाही.


 इतर महत्त्वाच्या बातम्या: