PM KISAN 11th Installment 2022: जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली असेल. तसेच तुम्ही देखील 2000 रुपयांच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत आहात, तर 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येतील की नाही, हे जाऊन घेण्यासाठी लवकरच यादीत आपलं नाव चेक करा. 12 कोटी 50 लाखांहून अधिक शेतकरी 11व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.


केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल


केंद्र सरकारने सांगितले आहे की, ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याचे पैसे खात्यात हवे आहेत, त्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांच्या खात्यात हे पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत.


जाणून घ्या काय आहे प्रक्रिया:



  • सर्वात आधी तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या अधिकृत लिंकवर जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर क्लिक करावे लागेल.

  • त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

  • आता तुम्हाला Village Dashboard वर जावे लागेल.

  • येथे तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण माहिती मिळेल

  • सर्व प्रथम राज्य निवडा, नंतर तुमचा जिल्हा, नंतर तहसील आणि नंतर तुमचे गाव.

  • त्यानंतर शो बटणावर क्लिक करा

  • त्यानंतर तुम्हाला ज्याबद्दल जाणून घ्यायचे आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण तपशील तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


कधी येणार खात्यात पैसे? 


यापूर्वी केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख 31 मे होती, मात्र आता ती 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. या हप्त्याचे पैसे 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते, असे बोलले जात आहे.


शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर


शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, 2000 रुपयांचे तीन हप्ते जारी केले जातात. आतापर्यंत सरकारने 10 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. सरकारने 1 जानेवारी रोजी 10 व्या हप्त्याचे पैसे वर्ग केले आहेत.