एक्स्प्लोर

क्रूड ऑईलच्या दरांत उसळी; देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही वधारणार?

Petrol Diesel Rate Today: आजही 215व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत, जाणून घ्या झटपट किमती.

Petrol Diesel Rate Today 27 December: जागतिक बाजारात (Global Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत क्रूडच्या किंमतीत सुमारे 1 डॉलरनं वाढ झाली असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 84 डॉलरच्या जवळ पोहोचलं आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol Diesel Rate) कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 24 तासांत त्याच्या किमतींत पुन्हा वाढ होत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत जवळपास 1 डॉलरवर चढून प्रति बॅरल 83.92 डॉलरवर पोहोचली आहे. तसेच, WTI ची किंमत 1 डॉलरनं वाढून 80.52 डॉलर प्रति बॅरल झाली आहे.

यापूर्वी 21 मे रोजी सरकारनं पेट्रोल डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट झाली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओदिशा आणि केरळ सरकारनंही व्हॅटमध्ये कपात केली होती.

Petrol Diesel Rate Today: देशातील महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर विकलं जातंय. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif On Samarjeetsinh Ghatge : मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Dharmaveer 2 : आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 Sept 2024Pune MVA Protest : आश्वासनानंतर मविआकडून आंदोलन मागे; मेट्रो कधी सुरु करणार? याची विचारणाNashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिरPune Metro MVA Protest : सिव्हिल कोर्ट स्टेशनबाहेर आंदोलन, मविआ  आक्रमक, पोसिसांचा मोठा फौजफाटा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif On Samarjeetsinh Ghatge : मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Dharmaveer 2 : आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
Kolhapur News : 1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन
1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन
BJP Manifesto : विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा आक्रमक आणि भेदक, झेरॉक्स माझावर
BJP Manifesto : विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा आक्रमक आणि भेदक, झेरॉक्स माझावर
Pune Hit and Run : पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या अडचणी वाढल्या, दिल्लीतील कॉलेजने प्रवेश नाकारला
पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या अडचणी वाढल्या, दिल्लीतील कॉलेजने प्रवेश नाकारला
एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण...; संजय राऊतांचा आरोप
एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण...; संजय राऊतांचा आरोप
Embed widget