Petrol Diesel Price Today 14 November 2022 : एकीकडे देशात महागाई ( Inflation ) वाढत असताना सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना भारतीय तेल कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात तेजी पाहायला मिळत असताना याचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. देशात आजही इंधन दर स्थिर आहेत.


कच्च्या तेलाच्या दरात तेजी


देशात गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. नागरिकांकडून इंधन दरात कपात करण्याची मागणी होत असताना आजही इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात आज वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड 0.61 टक्क्यांनी वाढून 96.58 डॉवर प्रति बॅरल इतकं झालं आहे. तर WTI क्रूड ऑईल 0.54 टक्क्यांनी वाढून 89.44 डॉलर प्रति बॅरल झालं आहे.


आजही इंधनाचे दर स्थिर


सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी 14 नोव्हेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सलग 176 व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आजही इंधनाचे दर स्थिर आहेत.


देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर



  • मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर

  • दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर

  • कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर

  • चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर


मे महिन्यामध्ये उत्पादन शुल्कात कपात


केंद्र सरकारने 21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा आणि केरळ सरकारनेही उत्पादन शुल्कात कपात केली.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.