Petrol Diesel Price Today:  गुजरात (Gujarat Election Result),  हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Election) विधानसभा आणि देशातील इतर राज्यातील पोटनिवडणूक (Bypoll Result) पार पडल्यानंतर आज देशातील इंधन कंपन्यांनी सकाळी 6 वाजता आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले (Petro Diesel Price Today) आहेत. तर, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण (Crude Oil Price) झाली आहे. मात्र, याचा भारतीय ग्राहकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. देशातील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 


भारतातील इंधन कंपन्यांनी एप्रिल महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांची वाढ केली होती. त्यानंतर, केंद्र सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले होते. जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने इंधन दरावरील व्हॅटमध्ये कपात केली होती. त्यानंतर इंधन कंपन्यांनी आणि केंद्र सरकारने भारतीयांना कोणताही दिलासा दिला नाही. मागील सहा महिन्यापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. 


कच्च्या तेलाच्या दरात घसरण


मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 76.98 डॉलर इतका आहे. तर, WTI क्रूड ऑइलचा दर 72.36 डॉलर  प्रति बॅरल इतका आहे. गुरुवारच्या तुलनेत आज कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत.


देशातील प्रमुख शहरातील दर


> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर


> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 


पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या 


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात. 


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.