Petrol Diesel Price : सर्वसामान्य लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमतीमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने (government ) त्यासाठी खास प्लॅन तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol Diesel Price) घट होण्याची शक्यता आहे. मागील 20 महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, लोकसभा 2024 पूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्येही घट होऊ शकते. याबाबत केंद्र सरकार चर्चा करत आहे. ओएमसी प्रति लीटर पेट्रोलवर 8 ते 10 रुपयांचा तर डिझेलवर 4 ते 5 रुपयांचा नफा कमावत आहे. रिपोर्ट्सनुसार, तेल मंत्रालय आणि ओएमसी (OMC) यांच्यामध्ये कच्चे तेल आणि विक्रीची किंमत याबाबत चर्चा झालेली आहे.
रिपोर्ट्सनुसार, ऑयल मार्केटिंग कंपन्या (ओएमसी) पेट्रोल आणि डिझेलमधून भरघोस नफा कमवात आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तेलांच्या किंमती कमी करण्याबाबत चर्चा सुरु आहे. अर्थ मंत्रालय आणि तेल मंत्रालय सध्याच्या कच्च्या तेलाच्या किमतीवर विचार करत आहे. ओएमसी प्रोफिटेबिलिटी शिवाय ग्लोबल फॅक्टर्सवरही चर्चा सुरु आहे.
इंधनाची किमत कमी होण्याचे कारण काय ?
मागील तीन ते चार महिन्यापासून ओएमसीने मोठा नफा कमावला आहे. त्यामुळे त्यांची मागील दोन वर्षांतील तूट भरुन निघाली आहे. रिपोर्ट्सनुसार, तीन ओएमसी – आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तिन्हीचे तिमाई नफा 28,000 हजार कोटी रुपये इतका राहिलाय. आता ओएमसीची तूट भरुन निघाली आहे, त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांनाही मिळावा, असा सरकारचा विचार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, मागणी कमी होत असताना आणि OPEC+ पुरवठा कपात वाढवण्याबाबत अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत.
याआधी मिंट वेबसाईटने तज्ज्ञांच्या अहवालानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये घट झाल्याने महागाई नियंत्रणात ठेवण्यात भारताला यश येईल, असे सांगितले होते. इंधनाच्या किमती घटल्यामुळे भारताच्या इक्विटी मार्केटला फायदा होणार आहे. त्याशिवाय काही मोठ्या क्षेत्राच्या किमती घसरल्यामुळे इंधनाचे दरामध्येही घट होऊ शकते.
कच्च्या तेलाच्या किमती किती ?
कच्च्या तिलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून 80 डॉलर प्रति बॅरेलपेक्षा कमी आहेत. मागील महिन्यापासून खाडी देशात इंधानाची सरासरी किमत 80 डॉलर प्रति बॅरेलपेक्षा कमी राहिली आहे. तर अमेरिकेतील ही किमत 75 डॉलर प्रति बॅरेलपेक्षा कमी आहे. सोमवारी खाडी देशात बॅरेलची किमत 75.99 प्रति डॉलर इतकी आहे तर अमेरिकत 71.34 डॉलर अशी किमत आहे.