Petrol Diesel Price in 29 November 2022: तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी दिल्ली (Delhi) आणि चेन्नईमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात करण्याची घोषणा केली होती. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. 


आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर



  • दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत यापूर्वी 22 मे रोजी देशातील चार महानगरांमध्ये झाला होता. जवळपास सहा महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, 22 मे 2022 रोजी सरकारनं उत्पादन शुल्क कमी केलं होतं, त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. 


तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या, एका क्लिकवर 




 



इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).