Credit Card, Loan Fraud : आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. डिजिटल युगात (Digital) अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, पण त्यासाबोतच फसवणुकीच्या (Fraud) घटनांमध्ये वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारीचं (Cyber Crime) प्रमाण वाढलं आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी (Scam) वेगवेगळ्या शक्कल लढवतात. हे प्रकार रोखण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे. सध्या फसवणुकीचा एका प्रकारातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. ज्यामध्ये गुन्हेगार एखाद्या व्यक्तीच्या नावावर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवतात. ज्या व्यक्तीच्या नावावर हे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतलं आहे, त्या व्यक्तीला याबाबत माहिती मिळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. 


फसवणुकीच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढतंच


देशात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. आता अनेक लोक बनावट कागदपत्रे किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचा चुकीचा वापर करुन कर्ज किंवा क्रेडिट कार्डही घेतात. त्या व्यक्तीला याची कोणतीही माहिती नसते. अशा प्रकारची फसवणूक टाळणं खूप गरजेचं आहे.  तुमच्या नावावर किती कर्ज किंवा क्रेडिट कार्ड आहेत, तुम्ही तपासू शकता, पण ते कसं हे सविस्तर वाचा.


तुम्ही तुमच्या नावावर किती कर्ज किंवा क्रेडिट कार्ड जारी केले आहेत हे सहज तपासू शकता.


तुमच्या नावावर किती कर्ज किंवा क्रेडिट कार्ड आहेत?


तुमच्या नावावर किती कर्ज किंवा क्रेडिट कार्ड जारी केले आहेत, हे तपासण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सिबिल स्कोअर तपासून तुमच्या नावावर किती कर्ज किंवा क्रेडिट कार्ड आहेत हे तुम्ही सहज तपासू शकता.


CIBIL.com, Paytm यासारख्या अनेक अॅप्सवर तुम्ही CIBIL स्कोअर मोफत तपासू शकता.


CIBIL स्कोअर कसा तपासायचा? (How To Check CIBIl Score)



  • तुमचा CIBIL स्कोर तपासण्यासाठी www.cibil.com ला भेट द्या.

  • यानंतर तुम्ही होम पेजवर Get Your Free CIBIL Score पर्यायावर क्लिक करा.

  • आता तुमचं नाव, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

  • लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमचा पिन कोड, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल.

  • ही सर्व माहिती भरल्यानंतर Accept आणि Continue पर्यायावर क्लिक करा.

  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो प्रविष्ट करा.

  • OTP टाकल्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल.

  • यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर जावं लागेल.

  • येथे तुम्हाला CIBIL स्कोर दिसेल, त्यासोबत तुम्ही तुमच्या नावावर किती कर्जे किंवा क्रेडिट कार्ड आहेत हे देखील तपासू शकता.


फसवणूक झाल्यास काय करावं?


तुम्हाला तुमच्या CIBIL स्कोअरमध्ये काही फरक आढळल्यास, तुम्ही क्रेडिट ब्युरो आणि क्रेडिट ग्रँटिंग कंपनीशी संपर्क साधू शकता. तुम्ही त्यांना ही समस्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यास सांगू शकता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bank FD Rates : 'या' सरकारी बँकांकडून व्याज दरात वाढ, एफडीवर 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर; यादी पाहा