Net Avenue Technologies IPO : शेअर बाजारात (Share Market) दररोज नवनवीन कंपन्या लिस्टिंग (Stock Market Listing) करत असतात. आणखी एक कंपनी शेअर बाजारात उतरत आहे. विशेष म्हणजे या आयपीओ (IPO) ची किंमत 16 ते 18 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या आयपीओत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहे. हा आयपीओ दोन दिवसात 54 वेळा सबस्क्राइब करण्यात आला आहे. रिटेल इन्व्हेसर्संनी 89 वेळा हा आयपीओ सबस्क्राईब केला आहे.
16 रुपयांच्या IPO वर गुंतवणूकदारांचा दाव
नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी (Net Avenue Technologies) चा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. त्याआधी आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 30 नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. आज 4 डिसेंबरला याचं सबस्क्रिप्शन बंद होणार आहे. 12 डिसेंबरला नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी (Net Avenue Technologies) चा आयपीओ शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे.
दोन दिवसांत 54 वेळा सबस्क्राइब
नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी (Net Avenue Technologies) हा लघु आणि मध्यम उद्योग (SME : Small and Medium-sized Enterprises) विभागाचा आयपीओ (IPO) आहे. हा आयपीओ दोन दिवसांत 54.58 वेळा बुक (SubScribe) झाला आहे. Chittorgarh.com डेटानुसार, या आयपीओमध्ये 1 डिसेंबरपर्यंत, किरकोळ विभागातील गुंतवणूक 89.06 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (QIB) 0.41 पट आणि गैर-संस्था गुंतवणूकदारांकडून 46.17 पट होती.
61 टक्के नफा मिळण्याचे संकेत
टॉप शेअर ब्रोकरच्या अहवालानुसार, कंपनीचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 11 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास कंपनी 61 टक्के प्रीमियमवर शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकते. नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 10.25 कोटी रुपयांचा आहे. नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी (Net Avenue Technologies) चा आयपीओ आज बंद होणार आहे. त्यामुळे आज या आयपीओत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी आहे.
पहिल्या दिवसात 14 वेळा सबस्क्रिप्शन
पब्लिक इश्यूद्वारे या IPO मध्ये 37,92,000 बोलींच्या तुलनेत 20,69,84,000 अर्ज मिळाले आहेत. या SME IPO ला बोलीच्या पहिल्या दिवशी 14 पेक्षा जास्त वेळा सबस्क्रिप्शन मिळालं होतं, ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी 23.37 पट आणि NII द्वारे 10.74 पट सबस्क्रिप्शन घेतलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :