नवी दिल्ली : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवत घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताच्या तिन्ही दलांनी संयुक्तपणे अभियान राबवत  पाकिस्तानातील 5 आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीरमधील 4 ठिकाणी एअर स्ट्राइक केले.भारताच्या या हल्ल्यामुळं पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं.  पाकिस्तानी शेअर मार्केटमधील प्रमुख निर्देशांक केएसई 100 हा 3559 अंकांनी घसरला.  पाकिस्तानी शेअर बाजारातील केएसई 100 हा निर्देशांक 3.3 टक्क्यांनी घसरुन 1,10,009 अंकांवर बंद झाला. 

Continues below advertisement


केएसई 100 निर्देशांक सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा 6560.82 अंकांनी घसरुन 107007.68 अंकांवर पोहोचला होता. पाकिस्तानातील टॉपलाईन सिक्युरीटीज या ब्रोकरेज फर्मनं  पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये गेल्या 9 व्यापार सत्रात 4.1 टक्के घसरण झाल्याचं म्हटलं. 


केएसई 100 निर्देशांक मंगळवारी देखील घसरला होता. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडून व्याज दरात कपात करण्यात आल्यानंतर देखील शेअर बाजारात घसरण झाली. मंगळवारी पाकिस्तानचा शेअर बाजार 533.73 अंकांनी घसरला होता. 


भारताकडून ऑपरेशन सिंदूर द्वारे पहलगामचा बदला पूर्ण


भारतीय सुरक्षा दलंनी संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील  9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. भारतानं पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये न जाता हे हल्ले केले आहेत. पहलगाम मध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 25  भारतीय आणि 1 नेपाळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 


केएसई 100 निर्देशांक पुलवामा दहशतवादी हल्ल्यावेळी 2 टक्क्यांनी घसरला होता. तर, त्यानंतर बालाकोटमध्ये भारतानं एअर स्ट्राईक केला होता त्यावेळी केएसई 100 निर्देशांक 1.40 टक्क्यांनी घसरला होता. 


आर्थिक समस्यांमुळं केएसई 100 निर्देशांकात घसरण


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटवर विपरीत परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक अस्थिरतेमुळं  स्टॉक मार्केट केएसई 100 निर्देशांकात घसरण सुरु आहे.


भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतानं सिंधू जल करार स्थगित केलेला आहे.  भारतानं चिनाब नदीतून वाहून जाणारं पाणी अडवलं आहे.


दरम्यान, स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं व्याज दरात कपात जाहीर केली आहे.त्याचा परिणाम देखील केएसई 100 निर्देशांकावर दिसून आला नाही. केएसई 100 निर्देशांकात घसरण सुरु होती. पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब असल्यानं त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. 


इतर बातम्या :


खोटारडा पाकिस्तान... दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी आर्मी अधिकारी अन् पोलीस IG


नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तानातून गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल