Onion News : केंद्र सरकारनं कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर आता निर्यात शुल्कातही (Export charges) सरकारकडून कपात करण्यात आली आहे. कांद्यावर आता 40 टक्के निर्यात शुल्काऐवजी 20 टक्के शुल्क आकारणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. 


केंद्रीय वित्त मंत्रालयानं काढली अधिसूचना 


कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क ऐवजी 20 टक्के शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काढली आहे. या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. 


19 ऑगस्ट 2023 कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावले होते


19 ऑगस्ट 2023 कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते...
28 ऑक्टोबर 2023 ला कांद्यावर 800 डॉलर प्रति मेट्रिक टन निर्यातमूल्य लावले होते..
7 डिसेंबर 2023 निर्यातबंदी करण्यात आली होती.
4 मे निर्यातबंदी उठवली मात्र निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते आणि 550 डॉलर किमान निर्यात मूल्य लावण्यात आले.
- आज कांदा निर्यात वरील 550 डॉलर निर्यातमूल्य रद्द.


सध्या कांद्याला दर किती?


गेल्या 20 दिवसांपासून कांद्याचे भाव कडाडले होते. विशेषत: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कांद्याची सरासरी किंमत 58 रुपये प्रतिकिलो आहे. तर संपूर्ण भारतीय कांद्याचा कमाल दर 80 रुपये प्रति किलो आहे. अशा स्थितीत सरकारच्या या निर्णयाचा कांद्याच्या दरावरही परिणाम होणार आहे.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय


दरम्यान, राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहे. दौरे, सभा, बैठका, संवाद मेळावे सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या मुद्याच महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सावध पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना सरकारकडून कांदा निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा निर्यात करणारे राज्य आहे. सरकारच्या या पाऊलांमुळे शेतकऱ्यांना कांदा निर्यात करण्यास मदत होणार आहे. याआधी शनिवारी, 4 मे 2024 रोजी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी : मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले