Nifty Record High : शेअर बाजारातून (stock market) एक आनंदाची बातमी येत आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीला आज निफ्टी (Nifty) पुन्हा विक्रमी उच्च पातळीवर उघडला आहे. निफ्टी प्रथमच 22,290 च्या पातळीवर उघडला आहे. हा त्याचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामुळं शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
कशी झाली बाजाराची सुरुवात?
आजच्या व्यवहारात, निफ्टीने प्रथमच 22,297.50 चा स्तर गाठला आहे. हा त्याचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. NSE चा निफ्टी 72.55 अंक किंवा 0.33 टक्क्यांच्या वाढीसह 22,290 च्या पातळीवर उघडला आणि ही विक्रमी सलामीची पातळी आहे. BSE सेन्सेक्स 236.20 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी वाढून 73,394 च्या पातळीवर उघडला.
निफ्टी शेअर्सची स्थिती काय?
निफ्टीच्या 50 समभागांपैकी 29 वाढीसह तर 20 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. कोणताही बदल न करता फक्त एका स्टॉकची खरेदी-विक्री केली जाते. सुरुवातीच्या काही मिनिटांतच बीएसई सेन्सेक्स 73413.93 वर पोहोचला आहे आणि त्याची सर्वकालीन उच्च पातळी 73427 आहे, जी आज ओलांडण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या: