New India Cooperative Bank case : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक (New India Cooperative Bank case) गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना ( Hitesh Mehta) अटक केली आहे. हितेश मेहतांवर दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. हाच गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. हितेश मेहतांवर न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या दादर व गोरेगाव येथील शाखेतन 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 

हितेश मेहतांवर 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप 

हितेश मेहता यांच्यावर 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हितेश मेहता यांनी दादर आणि गोरेगाव येथील बँकेच्या शाखेतून गैरव्यवहार करत तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. हितेश हा बँकेचा अकाउंट हेड होता, त्याच्याकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. तसेच जीएसटी आणि टीडीएसबाबत आणि पूर्ण अकाउंट सांभाळण्याची जबाबदारीही त्याला देण्यात आली होती. त्याने प्रभादेवी शाखेतून 112 करोड तर गोरेगाव शाखेतून 10 करोड रुपये गायब केल्याची माहिती मिळते आहे. याबाबत बँकेच्यावतीने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेहता बरोबर आणखी ही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मंगेश शिंदे यांनी दिली.  

RBI ने दोन दिवसांपूर्वीच या बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले होते

या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. या प्रकरणात हितेश मेहता यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर अटक करण्यात आली आहे.  RBI ने दोन दिवसांपूर्वीच या बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले होते. न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक वर आरबीआय बँकेने निर्बंध लादले आहेत. यामुळं या बँकांच्या बाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी आहे.

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या 30 पेक्षा जास्त शाखा

दरम्यान, न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या 30 पेक्षा जास्त शाखा आहेत. बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच  या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. 

 

महत्वाच्या बातम्या:

2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी