NACDAC आयपीओनं गुंतवणूकदार मालामाल, बीएसईवर धमाकेदार लिस्टींग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
NACDAC IPO : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एनसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चरचा एसएमई आयपीओ बीएसईवर लिस्ट झाला. हा आयपीओ 90 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला.

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात एनसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ लिस्ट झाला. या आयपीओनं गुंतवणूकदारांना लिस्टींगवेळीच दमदार परतावा दिला. लिस्टींग नंतर देखील या कंपनीच्या शेअर मध्ये वाढ झाली असून जवळपास गुंतवणूकदारांना 99.49 टक्के परतावा मिळाला आहे.
उत्तर प्रदेशातील एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीनं 10 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी एसएमई आयपीओ आणला होता. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल होता. या आयपीओला सबस्क्राइब करण्याची मुदत 17 ते 19 डिसेंबर दरम्यान होती.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या 10 कोटींच्या एसएमई आयीओसाठी तब्बल 14 हजार कोटी रुपयांची बोली लागली होती. हा आयपीओ तब्बल 1976 पट सबस्क्राइब झाला होता.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चरच्या एका लॉटसाठी 1 लाख 32 हजार रुपये लागणार होते. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 4 हजार शेअर होते. या कंपनीचा किंमतपट्टा 33-35 रुपये निश्चित करण्यात आला होता. हा आयपीओ 66.50 रुपयांना लिस्ट झाला. म्हणजेच गुंतवणूकदारांना जवळपास 90 टक्के परतावा मिळाला. सध्या या कंपनीचा शेअर 69.82 रुपयांवर ट्रेड होत आहे. म्हणजेच गुंतणूकदारांना 99.49 टक्के परतावा मिळाला आहे.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चरनं ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 20.8 लाख शेअर जारी केली. हा आयपीओ गुंतवणूकदारांनी 1976 पट सबस्क्राइब केला होता. या आयपीओसाठी जवळपास 14386 कोटी रुपयांची बोली लागली होती.
ग्रे मार्केट प्रिमियमच्या अंदाजानुसार जीएमपीच्या अंदाजापेक्षा कमी रुपयांवर लिस्ट झाला. ही कंपनी 2012 मध्ये स्थापन झाली होती.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चरकडून 7.8 लाख शेअरची विक्री दोन मुच्यूअल फंडला करण्यात आली होती. एआय महा इन्वेस्टमेंट फंडनं 4.9 लाख शेअर खरेदी केले आहेत. तर, विकासा इंडिया इआयएफ आय फंडनं या अमेरिकेतील फंडनं 2.9 लाख फंड खरेदी केले आहेत..
बीएसईवरील डेटानुसार गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजे उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांनी या आयपीओला 2635 पट सबस्क्राइब केलं होतं. रिटेल गुंतवणूकदारांनी 2504 पट सबस्क्राइब केलं होतं. तर, संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच म्युच्यूअल फंड्स, विमा कंपनी, विदेशी फंड या सारख्या संस्थांनी 236 पट आयपीओ सबस्क्राइब केला.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)



















