SIP Date मुंबई :गुंतवणुकीच्या लोकप्रिय पद्धतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रकार एसआयपी हा आहे. मोठ्या संख्येनंगुंतवणूकदारएसआयपीद्वारे पैशांची गुंतवणूक करतात. एसआयपी म्हणजेच ठराविक रक्कम तुमच्याकडून म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये गुंतवण्यात येते. काही गुंतवणूकदारांना कोणत्या तारखेला एसआयपीद्वारे गुंतवणूक केली की जास्त रिटर्न मिळतात, असा प्रश्न पडतो.
Which SIP Date Better for SIP : एसआयपीसाठी योग्य तारीख कोणती?
एसआयपीसाठी सर्वाधिक चांगली तारीख कोणती याबाबत काही अभ्यास समोर आले आहेत. कोणत्याही महिन्यातील 1,10,25 तारखेला गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीतमिळणारा परतावा जवळपास सारखा असतो. वार्षिक 0.2 ते 0.3 टक्के फरक असतो. 10 हजार रुपयांचीएसआयपी 12 टक्के सीएजीआरच्यारिटर्ननं केल्यास 20 वर्षात 98 लाखांचा फंड तयार होईल. यात 0.2 टक्क्यांचा विचार केल्यास यापेक्षा अधिक रक्कम काही हजारांची असेल.
एसआयपीद्वारे गुंतवणूक कोणत्या तारखेला करावी याचा विचार दीर्घकालीन गुंतवणूक करताना फारसा करावा लागत नाही. शॉर्टटर्मगुंतवणुकीत त्याचा परिणाम दिसू शकतो. लाँग टर्म गुंतवणूक करताना एसआयपीची तारीख निवडताना देखील विचार केला पाहिजे.
वित्तीय सल्लागारांच्या मते, तुमचा पगार कधी जमा होतो याचा विचार करुनएसआयपी तारीख निवडावी. ज्यामुळंएसआयपीचंपेमेंट थांबणार नाही. एसआयपीच्या रकमेचं तीन भागात वर्गीकरण करावं, असा सल्ला देखील काही जाणकार देतात.
वित्तीयसल्लागारांच्यामतेतुम्हीदरमहाजितक्यारकमेचीएसआयपीकरणारआहेतत्याचंतीनभागातविभाजनकरुनतीनतारखांनागुंतवणूककरावी. ज्यामुळंशेअरबाजारातीलघडामोडींचाफटकाकमीप्रमाणातबसतो. उदा. तुम्ही 12000 रुपयांचीगुंतवणूककरतअसालतर 5 तारखेला 4000, 15 तारखेला 4000 आणि 25 तारखेला 4000 रुपयांचीगुंतवणूककरुशकता. यामुळंवेगवेगळ्यादिवशीएनएवीच्याहिशोबानंयूनिटमिळूशकतात.
एसआयपीकरतानातारखेऐवजीकालावधीफारमहत्त्वाचाअसतो. म्हणजेचजितकीदीर्घकाळएसआयपीसुरुठेवलीजाईलतितकाजास्तफायदाहोऊशको. काहीजणांकडूनबाजारातघसरणझाल्यासएसआयपीद्वारेगुंतवणूकथांबवलीजाते. ज्यामुळंनुकसानहोतं. तसं न करताचांगलाफंडनिवडा, गुंतवणूकसुरुठेवाआणिशिस्तीचंपालनकरा.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचागुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
