एक्स्प्लोर

Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं

Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात प्रमुख इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली आहे.  जानेवारी महिन्यातील आकडेवारी समोर आली आहे. 

नवी दिल्ली : भारतातील इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सलग दुसऱ्या महिन्यात कमी झाली आहे. शेअर बाजारातील कमोजर स्थिती, वाढता भूराजकीय तणाव आणि व्यापाराचे प्रश्न यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाल्यानं इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घडल्याचं असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियानं म्हटलं आहे.

इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली 

अधिकृत आकडेवारीनुसार इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जानेवारी महिन्यात 14.35 टक्क्यांनी घसरुन  24028.59 कोटी रुपये झाली आहे. डिसेंबर 2025 चा विचार केला असता ही आकडेवारी  25054.06 कोटी रुपये होती. 

नोव्हेंबर 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये  29911.05 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्यानंतर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत सलग दुसऱ्या महिन्यात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 
 
जानेवारी 2026 मध्ये फ्लेक्सी कॅप फंडमध्ये मोठी घसरण झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये फ्लेक्सी कॅप फंडमध्ये 10019.27 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ती जानेवारी महिन्यात 7672.36 कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच 2346.91 कोटी रुपयांनी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कमी झाली आहे. 

लार्ज आणि मिडकॅप फंडमधील गुंतवणूक देखील जानेवारीत कमी झाली आहे. लार्ज कॅप फंडमध्ये डिसेंबर महिन्यातील गुंतवणूक 4093.51 कोटी रुपये होती ती कमी होऊन 3181.89 कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच 22.3 टक्के घसरण झाली आहे. मिड कॅप फंडमधील गुंतवणूक डिसेंबर महिन्यात 4175.81 कोटी रुपये होती त्यात घसरण होऊन जानेवारीतील गुंतवणूक 3185.47  कोटी रुपये झाली आहे.    

स्मॉल कॅप फंडमध्ये थोडी बरी स्थिती पाहायला मिळाली. डिसेंबर महिन्यात स्मॉल कॅप फंडमधील गुंतवणूक  3823.82 कोटी रुपये झाली होती. ती कमी होऊन जानेवारी महिन्यात 2942.11 कोटी रुपयांवर आली आहे. म्हणजेच एकूण 881.71 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. 

इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कमी झाली असली तरी एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक कायम आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीची रक्कम 31000 कोटींवर पोहोचली आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमधील असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 16.6 लाख कोटींवर पोहोचली आहे.  

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजीचं चित्र पाहायला मिळतंय. भारत आणि अमेरिका व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसतोय.
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Embed widget