Mumbai Terrorist Attack : मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला (Mumbai Terrorist Attack) आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजीचा दिवस हा मुंबईसाठी (Mumbai) काळा दिवस ठरला होता. या दिवशी पाकिस्तामधून आलेल्या काही दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी हल्ला केला होता. यामध्ये 166 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यात मुंबईचे करोडोंचे नुकसान झाले होते, त्या जखमा आजही ताज्या आहेत.
26/11 चे ते भीषण दृश्य मुंबईतील जनता कधीच विसरू शकत नाही. एकाच वेळी झालेल्या हल्ल्यांमध्ये 166 लोकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानातील 10 दहशतवाद्यांनी जवळपास 60 तास मुंबईला वेठीस धरले होते. या हल्ल्यामुळे मुंबईतील ताज, ओबेरॉय या मोठ्या हॉटेलच्या व्यवसायाचे करोडोंचे नुकसान झाले होते. मुंबईला मोठा आर्थिक फटका या हल्ल्याचा बसला होता. तसेच अनेक निष्पाप लोकांचा बळी या हल्ल्यात गेला होता.
ताज हॉटेलचे 114 कोटी रुपयांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रतिष्ठित हॉटेल ताज पॅलेसचे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मोठं नुकसान झालं होते. या हल्ल्यात ताज हॉटेलचं 114 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेच नुकसान झालं होतं. सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे खूप अवघड आहे. सर्वेक्षण केल्यानंतर जवळफास 114 कोटी रुपयाहून अधिक मालमत्तेचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे उलटून गेली असली तरी त्याच्या जखमा आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. 26/11 चे ते भयानक दृश्य मुंबईकर कधीही विसरु शकणार नाहीत.
तब्बल 60 तास हॉटेल व्यवसाय ठप्प
ओबेरॉय हॉटेल, नरिमन पॉइंट, झवेरी बाजार, ताज हॉटेल यांचा व्यवसाय तबब्ल 60 तासांहून अधिक काळ ठप्प झाला होता. येथे दररोज 1000 कोटी रुपयांचा व्यवसाय होत होता. परंतु या हल्ल्यामुळं त्यांचा सर्व व्यवसाय ठप्प झाला होता.
'या' ठिकाणी झाले होते हल्ले
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील अनेक ठिकाणांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये अनेकांचा नाहक बळी गेला होता. तसचे मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झालं होतं.
हल्ला झालेल्या ठिकाणांमध्ये सीएसटीच्या जवळ असलेल्या लिओपोल्ड कॅफे (Leopold Cafe Mumbai Attack), छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST Mumbai Attack), ओबेरॉय हॉटेल (Mumbai Oberoi Hotel Attack), कामा हॉस्पिटल (Cama Hospital Terrorist Attack), नरिमन हाऊस (Nariman House Attack) ताज हॉटेल (Hotel Taj Mahal Palace Terrorist Attack)
समुद्राच्या मार्गाने मुंबईत घुसले
पाकिस्तानातील कराचीहून 10 दहशतवादी समुद्राच्या मार्गाने मुंबईत घुसले. ते दोन दोनच्या गटाने मुंबईत घुसले होते. सुरूवातीला झालेल्या गोळीबारानंतर हा गँगवॉरचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला होता. त्यानंतर मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं लक्षात आलं. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांचे काही धाडसी अधिकारी शहीद झाले. या गोळीबारात हशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांतील धाडसी अधिकारी अशोक कामटे आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर हे शहीद झाले.
मुंबईवरील हल्ल्यामधील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी म्हणजे अजमल कसाब. मुंबई पोलिसांच्या तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून कसाबला जिवंत पकडलं. त्यामध्ये ओंबाळे शहीद झाले. पण त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे पाकिस्तानचा बुरखा मात्र फाडला गेला.
महत्त्वाच्या बातम्या: