मुंबई : Man Infraconstruction Ltd कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकनं 24 जूनला दमदा कामगिरी केली.  एका दिवसात या स्टॉकमध्ये 6 टक्के तेजी पाहायला मिळाली.याचं कारण कंपनीच्या प्रमोटर मानसी पी. शाह यांनी त्यांची भागीदारी वाढवली आहे. हा गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. 

Continues below advertisement

5 वर्षात  1100 टक्के रिटर्न

या कंपनीच्या शेअरची आज 160.75 रुपयांवर झाली त्यानंतर शेअर 171.67 रुपयांपर्यंत पोहोचला. यानंतर काही तासांमध्ये या स्टॉकमध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली. या स्टॉकनं गेल्या 5 वर्षात 1166 टक्के रिटर्न दिले आहेत. यामुळं या स्टॉकला मल्टीबॅगर स्टॉक म्हटलं जातं.  

Man Infraconstruction चं वैशिष्ट्य काय?

मुंबई येथील Man Infraconstruction Ltd  ही कंपनी अभियांत्रिकी, उत्पादन आणि बांधाम क्षेत्रात कार्यरत आहे, ही कंपनी रिअल इस्टेट  डेव्हपमेंट कंपनी आहे. यांचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण आहे. निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रात कंपनी आहे.  

Continues below advertisement

बीएसईच्या डेटानुसार प्रमोटर मानसी पी. शाह यांनी सध्याच्या 5.97 कोटी शेअरच्या शिवाय 67 हजार शेअरची खरेदी केली आहे. यामुळं त्यांची भागीदारी 15.53 वर पोहोचली आहे. यामुळं प्रमोटरला कंपनीच्या भविष्याबाबत खात्री असल्याचं दिसून येतं.  

Quant Mutual Fund कडे   Man Infraconstruction चे 77.8 लाख शेअर आहेत. म्हणजेच कंपनीत 2.07 टक्के भागीदारी आहे. तर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडे 3.81 टक्के भागीदारी आहे. 

आर्थिक वर्ष  2024-25 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीनं दमदार कामगिरी केली होती. कंपनीचा निव्वळ नफा 50 टक्के वाढीसह 97.15 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी कंपनीचा नफा 64.15 कोटी होता.कंपनीचा महसूल 21 टक्के वाढून 294 कोटी रुपये झाला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत महसूल 242 कोटी रुपये होता.  कंपनीनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी लाभांश प्रति शेअर 0.45 रुपये जाहीर केला आहे. लाभांशाचा फायदा 37.52 कोटी शेअरधारकांना होणार आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)