एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मोबाईल चेक करा; जानेवारीचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आतापर्यंत किती हप्ते मिळाले?

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागानं सोमवारपासून (23 जानेवारी) जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळं दिलासा मिळाला आहे. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. 

लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यासाठी 18 फेब्रुवारीला सामाजिक न्याय विभागानं महिला व बाल विकास विभागाला 98 कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली होती.  ही रक्कम महिला व बाल विकास विभागाला मिळाल्यानंतर सोमवारपासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागानं याबाबत माहिती दिली आहे. 

लाडक्या बहिणींच्या संख्येत घट? 

डिसेंबर  2025 महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याच्या 14 तारखेदरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करणं बंधनकारक केलं होतं. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळतंय. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 ला करण्यात आली होती. तेव्हा लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी  46 लाखांच्या दरम्यान होती. त्यानंतर राज्य सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. 1 कोटी 90 लाख महिला लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यापैकी योग्य केवायसी भरणाऱ्या 1 कोटी  60 लाख महिलांच्या खात्यात महिला व बाल विकास विभागनं डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे पाठवले होते. 

ई केवायसी दुरुस्तीसाठी संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून ई केवायसी प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळं महिला लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी दिली आहे. आता ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी देण्यात आली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून जानेवारी 2026 चा हप्ता विचारात घेतल्यास 19 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात.  

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कुठे कराल अर्ज? 
बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कुठे कराल अर्ज? 
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage India : सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्देश
सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना, 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
Embed widget