Ladki Bahin Yojana मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करताना काही नियम आणि अटी तयार केल्या होत्या त्या अटींप्रमाणं योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ई केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्या ई केवायसी दुरुस्तीसाठी महिला व बाल विकास विभागानं दिलेली मुदतवाढ 30 एप्रिलला संपणार आहे.  त्यामुळं ज्या महिलांना ई केवायसी दुरुस्त करुन घ्यायची आहे, त्यांच्यासाठी शेवटचे काही तास बाकी आहेत. याशिवाय लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा आहे. 

Continues below advertisement

मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? 

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेतून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपये दिले जातात. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 मार्चला जमा करण्यात आला होता. आता मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. एप्रिल महिन्यातील शेवटचे काही दिवस सुरु आहेत, त्यामुळं लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा आहे.  

ईकेवायसी दुरुस्ती साठी शेवटचे काही दिवस?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटींनुसार योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा या उद्देशानं ई केवायसी प्रक्रिया राबवली गेली होती. ई केवायसी प्रक्रिया करत असताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं त्यांचा लाभ स्थगित झाला होता, त्यामुळं महिला व बालविकास विभागानं ई केवायसी दुरुस्तीसाठी यापूर्वी अनेकदा दुरुस्तीची संधी दिली होती आणि त्याला वेळोवेळी मुदतवाढ देखील दिली गेली होती. त्यानुसार आता ई केवायसी दुरुस्ती 30 एप्रिलपर्यंत करता येणार आहे. त्यामुळं ज्या महिलांना ई-केवायसी दुरुस्त करायची असेल त्यांनी 30 एप्रिलपूर्वी करणं आवश्यक आहे. 

Continues below advertisement

लाडक्या बहिणींची संख्या घटली?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाली होती तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 40 लाखांच्या दरम्यान होती. मात्र, लाखो महिलांनी ई केवायसी प्रक्रिया केलेली नाही त्यामुळं त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. ज्या महिला केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेत असतील त्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात.