एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम नुकतीच जमा झाली होती. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये दिले जातात.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र, योजनेच्या शासन निर्णयानुसार काही लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपयांची रक्कम दिली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मा निधी योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून 12000 रुपये मिळतात. याचा संदर्भ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी जोडण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसानच्या दोन्ही योजनेचे मिळून 12000 रुपये मिळत असतील. तर, महाराष्ट्र सरकारच्या डीबीटी संदर्भातील धोरणानुसार थेट खात्यात रक्कम पाठवण्याची मर्यादा 18000 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार लाडकी बहीणच्या लाभार्थी महिलेला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मानचे 12000 रुपये मिळत असतील तर त्यांना दर उर्वरित 6000 रुपयांची रक्कम 500 रुपये दरमहा अशी दिली जाते. त्यामुळं पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीला दरमहा योजनेतून 500 रुपये मिळतात. यासंदर्भातील नियम योजनेच्या मूळ शासन निर्णयात आहे.

किती लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळतात?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागातर्फे चालवली जाते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना 500 रुपये दिले जातात त्यांची आकडेवारी जाहीर केली होती. पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मानचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांची संख्या  774148 इतकी आहे. या लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपये दिले जातात. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणतेही बदल केलेले नाहीत. योजनेच्या शासन निर्णयामध्येच हे निकष होते. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातो.

लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळाली?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली. तेव्हापासून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा निधी दिला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना काही वेळा दोन महिन्यांची रक्कम एकत्रित देण्यात आली होती. महायुतीच्या घटकपक्षांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100  रुपये देण्याची घोषणा केली होती. निवडणुकीतील त्या घोषणेची अंमलबजावणी महायुती कधी करणार याकडे लक्ष लागलंय.लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे मिळून 16500 रुपये मिळाले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'सखोल चौकशी करणार', लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोटात ११ ठार; गृहमंत्री अमित शहा
Delhi Terror Alert: 'सर्व शक्यता तपासून सखोल चौकशी होणार', गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य.
DelhiBlast: लाल किल्ल्याजवळ भीषण कार स्फोटात 8 ठार, 'पॅटर्न' वेगळा असल्याने यंत्रणा संभ्रमात
Delhi Red Fort Blast : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; घटनास्थळावरुन ग्राऊंड रिपोर्ट
Delhi Blast Amit Shah : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget