एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये देण्यात आले आहेत. 

Ladki Bahin Yojana मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना ज्यावेळी सुरु करण्यात आली तेव्हाची लाभार्थी संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. एप्रिल 2026 मध्ये लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊन 1 कोटी 77 लाखांवर आलेली आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. ही योजना महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते. यातील लाभार्थी महिलांना सुरुवातीला ई केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, त्यानंतर ई केवायसी दुरुस्तीसाठी देखील 30  एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. 

एप्रिल महिन्यातील लाभार्थींची संख्या

महाराष्ट्र सरकारनं ही योजना ज्यावेळी सुरु केली तेव्हा या योजनेचे निकष देखील जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही पात्रतेच्या अटी लावण्यात आल्या होत्या. ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असेल त्या कुटुंबातील महिला पात्र असा निकष करण्यात आला होता. या निकषानुसार पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. काही महिलांनी ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यानं त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. 

ई केवायसी दुरुस्तीनंतर एप्रिलमध्ये पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1 कोटी 77 लाख इतकं असल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजेच जवळपास 70 लाख महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यानं किंवा इतर कारणांमुळं त्या अपात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारवरील आर्थिक दबाव देखील कमी झाला आहे.

शेवटचा पर्याय काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ई केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळं आता एखाद्या पात्र असलेल्या महिलेला कागदपत्रांची पूर्तता करायची असल्यास जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्रं सादर करावी लागतील. 

लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे  14 मे आणि 15 मे पासून देण्यात येत आहेत. 24  मार्चपासून लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट पाहणाऱ्या महिलांना यामुळं दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना 500 रुपये दिले जातात. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CAMIT : पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
RBI : आरबीआयचा कॅनरा बँकेला दणका, रिझर्व्ह बँकेनं 41.80 लाखांचा दंड ठोठावला, नेमकं कारण समोर
आरबीआयचा कॅनरा बँकेला दणका, रिझर्व्ह बँकेनं 41.80 लाखांचा दंड ठोठावला, नेमकं कारण समोर
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ
मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update El Nino: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
Cockroach Janta Party: अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Embed widget