एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : पात्र लाडक्या बहि‍णींच्या संख्येत मोठी घट, डिसेंबरचा लाभ 1 कोटी 60 महिलांना, ई केवायसीनंतर लाभार्थी संख्या 86 लाखांनी घटली?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ई-केवायसीनंतर संख्या घटल्याचं समोर आलं आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ई केवायसी प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा लाभ मिळालेल्या महिलांची संख्या 86 लाखांनी घटली आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं वृत्त दिलं आहे. 

महाराष्ट्रात सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. डिसेंबर महिन्याचा लाभ 1 कोटी 60 लाख महिलांना दिला गेला असल्याची माहिती आहे. म्हणजेच लाभ मिळणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या 86 लाखांनी कमी झाली आहे. 

लाडकी बहीण योजनेच्या एकूण लाभार्थी महिलांच्या संख्येपैकी 1 कोटी 90 लाख महिलांनी ई केवायसीसाठी अर्ज केला आहे. याचाच अर्थ 2 कोटी  46 लाख महिला लाभार्थ्यांपैकी 55 लाख महिला लाभार्थ्यांकडून ई केवायसी करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजनेच्या 1 कोटी 60 लाख महिलांनी योग्य प्रकारे ई केवायसी केल्यानं त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याची माहिती आहे. ज्या 1 कोटी 90 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यापैकी ज्यांच्याकडून पर्याय निवडण्यात चूक झाली आहे,त्यांना ई केवायसी दुरुस्त करता येईल. ई केवायसी दुरुस्तीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत आहे. 

ई केवायसी दुरुस्तीची शेवटची संधी 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात.  तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये दिले जातात. महायुतीमधील पक्षांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते कधी पूर्ण होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.   

जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना  डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या दरम्यान देण्यात आला होता. आता, लाडक्या बहिणींकडून जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा केली जात आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहि‍णींचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये करण्यात आली होती. महायुती सरकार सत्तेत येण्यास ही योजना कारणीभूत ठरली होती. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पात्र ठरण्यासाठी संबंधित कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. ज्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय  नोकरीमध्ये नसावा. याशिवाय संबंधित कुटुंबातील व्यक्तीच्या नावे चार चाकी वाहन नसावं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo Fare Hike: अमेरिका- इराण युद्धामुळं इंडिगोकडून इंधन अधिभार, 425 ते 2300 रुपयांनी तिकिट दर वाढले, मध्यरात्रीपासून दर लागू 
अमेरिका- इराण युद्धामुळं इंडिगोकडून इंधन अधिभार, 425 ते 2300 रुपयांनी तिकिट दर वाढले
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 640 कोटी रुपये जमा, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ? 
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 640 कोटी रुपये जमा, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ? 
जागतिक तणाव, ऊर्जा संकट आणि शेअर बाजारातील अस्थिरता; मार्च 2026 मध्ये निफ्टीत मोठी घसरण
जागतिक तणाव, ऊर्जा संकट आणि शेअर बाजारातील अस्थिरता; मार्च 2026 मध्ये निफ्टीत मोठी घसरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole : एपस्टीन फाईलमुळे सरेंडर पंतप्रधानांमुळे गॅसचा तुटवडा, विरोधकांची टीका
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Pune Mess Gas Shortage युद्धाचं संकट, ताटातून चपाती कट;मेसलाही व्यावसायिक गॅसमुळे झळा
Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Embed widget