Reliance Retail: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा बाजारात आपलं स्थान बळकट करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांची कंपनी रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी कपडे विकणारी कंपनी आहे. त्यांची देशभरात 4000 हून अधिक स्टोअर्स आहेत. रिलायन्स ट्रेंड्स ही सध्या सर्वात मोठी रिटेल फॅशन चेन आहे. आता कंपनी टियर-2 आणि 3 सारख्या लहान शहरांमध्ये सुमारे 500 नवीन स्टोअर उघडणार आहे. यासाठी कंपनी फ्रँचायझी देणार आहे.


कंपनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल


लहान शहरे आणि  मोठ्या शहरांमध्ये पकड मिळवण्यासाठी रिलायन्स रिटेल 'फॅशन वर्ल्ड बाय ट्रेंड्स' या नावाने ही नवीन दुकाने उघडण्यात येणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनी प्रथमच स्टोअर फॉरमॅटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनीने बिझनेस मॉडेलही तयार केले आहे. फ्रँचायझी मॉडेलचा अवलंब करुन, रिलायन्स ट्रेंड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. कंपनीला थेट व्ही मार्ट रिटेलशी स्पर्धा करावी लागणार आहे.


रिलायन्स ट्रेंड फ्रँचायझी वितरित करेल


कंपनीला माहित आहे की, सर्वत्र आपले स्टोअर उघडणे सोपे नाही. अशा स्थितीत ज्या ठिकाणी कंपनीचे स्टोअर्स नाहीत अशा ठिकाणी फ्रँचायझीचे वितरण केले जाईल. कंपनीने अलीकडेच सिलीगुडी, धुळे आणि औरंगाबाद येथे ‘फॅशन वर्ल्ड बाय ट्रेंड्स’ स्टोअर सुरू केले आहेत. लहान आणि मध्यम शहरांतील लोकांचे जीवनमान झपाट्याने वाढत असल्याचा कंपनीचा विश्वास आहे. इथल्या लोकांनाही ब्रँडेड कपडे हवे असतात. अशा परिस्थितीत तुमचा ब्रँड या लोकांपर्यंत वेगाने पोहोचवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 


कंपनीने 2600 ट्रेंड स्टोअर उघडले 


सध्या रिलायन्सची छोट्या शहरांमध्ये जवळपास 2,600 Trends स्टोअर्स आहेत. ‘फॅशन वर्ल्ड बाय ट्रेंड्स’ स्टोअर यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. अशी दुकाने फक्त 5000 चौरस फूट परिसरातच सुरू करता येतील. ट्रेंडची दुकाने बरीच मोठी आहेत. योजनेनुसार, कंपनी या महिन्यात अशी 20 दुकाने उघडणार आहे. 2024 मध्ये 100 हून अधिक दुकाने सुरू होतील. हे सर्व त्या शहरांमध्ये असतील जेथे Trends चे अद्याप स्टोअर नाहीत. परिस्थिती चांगली राहिल्यास त्याच शहरात आणखी दुकाने सुरू होऊ होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीने बिझनेस मॉडेलही तयार केले आहे. फ्रँचायझी मॉडेलचा अवलंब करुन, रिलायन्स ट्रेंड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. 


महत्त्वाच्या बातम्या:


रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा