Mukesh Ambani : आता लोकांचं घर आणि कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबांनी याआधीच देशातील जनतेला स्वस्त दरात मोबाईल आणि इंटरनेट सेवा उपलब्ध करुन दिली आहे. आता त्यांनी लोकांना घरे आणि गाड्या स्वस्त दरात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस गृह आणि कार कर्ज क्षेत्रात उतरणार आहे. यामुळं लोकांना घर आण कार घेणं स्वस्त होणार आहे.
मुकेश अंबांनी यांनी 'जिओ फोन'च्या रुपानं देशातील जनतेला स्वस्तात 4 जी फोन आणि स्वस्त इंटरनेट उपलब्ध करु दिले आहे. त्यानंतर आता मोठा निर्णय घेतला आहे. आता उद्योगपती मुकेश अंबानी लोकांना घर आणि कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. त्याची नवीन कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लवकरच गृह कर्ज आणि कार कर्ज विभागात प्रवेश करणार आहे. यामुळं लोकांचं नवीन घर आणि कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
जिओ फायनान्शियलला पूर्ण-सेवा वित्तीय कंपनी बनवण्याचे उद्दिष्ट
मुकेश अंबानी यांनी अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएम दरम्यान जाहीर केले होते की ते कर्ज आणि विमा व्यवसायात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लाँच करणार आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार, Jio Financial होम लोन आणि कार लोनच्या विविध उत्पादनांचा संपूर्ण समूह घेऊन येत आहे. जी वेगवेगळ्या विभागांच्या गरजा पूर्ण करेल. जिओ फायनान्शियल स्वतःला एक पूर्ण-सेवा वित्तीय कंपनी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कंपनी वैयक्तिक कर्ज देखील देणार
जर आपण मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा इतिहास पाहिला तर, कंपनीने नेहमी बाजारात व्यत्यय आणणारी उत्पादने आणण्यावर विश्वास ठेवला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिओ टेलिकॉमचे लॉन्चिंग आणि रिलायन्स रिटेलचा विस्तार. आता अशी अपेक्षा आहे की कंपनी Jio Financial Services च्या कर्ज उत्पादनांची रचना अशा प्रकारे करेल की ती देशातील प्रत्येक विभागाच्या गरजा पूर्ण करेल. असं असलं तरी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत इथल्या आर्थिक उत्पादनांमध्ये प्रत्येकाचा प्रवेश कमी आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आधीच ग्राहक टिकाऊ उत्पादनांसाठी वैयक्तिक कर्ज देते. तसेच आता त्याचे लक्ष व्यवसाय आणि व्यापारी कर्जावर आहे. यासह, कंपनी कार कर्ज, टू-व्हीलर कर्ज, गृह कर्ज आणि इतर कर्ज उत्पादन विभागांमध्ये प्रवेश करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
डेबिट कार्डही सुरु केलं जाणार
Jio Financial Services च्या विमा ब्रोकिंग युनिटने देशातील 24 विमा कंपन्यांशी करार केला आहे. म्हणजेच Jio त्यांचा विमा विकणार आहे. त्याचवेळी, त्याच्या पेमेंट बँक विभागाने त्याच्या बिल पेमेंट सेवा आणि बचत खाते पुन्हा लाँच केले आहे. कंपनी डेबिट कार्ड देखील सुरु करण्याची योजना आखत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: