Most expensive cities : तुम्हाला जगातील सर्वात महागडं शहर (Most expensive cities) कोणतं? याबाबत माहिती आहे का? या शहरात राहण्यासाठी तुम्हाला 1 BHK घराचं भाडे 4 लाख रुपये द्यावे लागते. तर केस कापण्यासाठी तुम्हाला 5000 रुपये द्यावे लागतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. लेटेस्ट मर्सर्ज 2024 कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. प्रवासासाठी देखील हाँगकाँग हे जगातील सर्वात महाग शहर आहे.
बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल आणि इतर राज्यांतील लोक जे कामाच्या शोधात दिल्ली किंवा मुंबईला जातात त्यांना वाटते की तेथे राहण्याचा खर्च खूप जास्त आहे. भारतात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु ही शहरे महाग आहेत. परंतू जगभरातील महागाईसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांबद्दल तुम्हाला माहित आहे का? पाहयुता सविस्तर माहिती.
हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, बाहेरुन काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर आहे. त्यानंतर सिंगापूरचा क्रमांक लागतो. स्वित्झर्लंडची चार शहरे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. यामध्ये झुरिच, जिनिव्हा, बासेल आणि बर्न या शहरांच्या नावांचा समावेश आहे. टॉप 30 मध्ये भारतातील एकाही शहराचे नाव नाही.
हाँगकाँगमध्ये 1 BHK साठी द्यावे लागतात 2.25 लाख ते 4.4 लाख रुपये
हाँगकाँगमध्ये राहण्याच्या खर्चावर काही संशोधन केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. उदाहरणार्थ, शहरातील एका चांगल्या ठिकाणी 1 बेडरूमचे अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 20,000 ते 35,000 HKD (Hong Kong Dollar) द्यावे लागतील. भारतीय चलनात ते अंदाजे 2.25 लाख ते 4.4 लाख रुपये आहेत. एक हाँगकाँग डॉलर भारतीय चलनाच्या 10.70 रुपये इतका आहे.
दुधाची किंमत 270 ते 320 रुपये प्रति लिटर
हाँगकाँगमध्ये, एक लिटर दुधाची किंमत 25 ते 30 HKD (हाँगकाँग डॉलर) आहे. म्हणजे भारतीय चलनात दुधाची किंमत सुमारे 270 ते 320 रुपये प्रति लिटर आहे. ब्रँडेड जीन्स पँटसाठी तुम्हाला 5,300 ते 10,500 रुपये मोजावे लागतात.
जगातील सर्वात महागडी शहरं कोणती?
1.हाँगकाँग 2. सिंगापूरचा 3. ज्यूरिख 4. जिनिव्हा5. बासेल6. बर्न 7.न्यूयॉर्क, अमेरिका8. लंडन, इंग्लंड9. नासाऊ, बहामास10. लॉस एंजेलिस, यूएसए11. कोपनहेगन, डेन्मार्क12. होनोलुलु, अमेरिका13. सॅन फ्रान्सिस्को, यूएसए14. बांगुई, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक15. दुबई, संयुक्त अरब अमिराती16. तेल अवीव, इस्रायल17. मियामी, अमेरिका18. जिबूती, जिबूती19. बोस्टन, अमेरिका20. शिकागो, अमेरिका21. N'Djamena, Chad22. वॉशिंग्टन, डी.सी., यू.एस23. शांघाय, चीन24. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया25. बीजिंग, चीन26. कोनाक्री, गिनी27. अटलांटा, यूएसए28. सिएटल, यूएसए29. पॅरिस, फ्रान्स30. आम्सटरडॅम, नेदरलँड
केस कापण्यासाठी 5000 रुपये
हाँगकाँगमध्ये केस कापण्यासाठी देखील मोठी रक्कम खर्च करावी लागते. केस कापण्यासाठी, तुम्हाला 5000 रुपयापर्यंतचा खर्च करावा लागतो. या ठिकाणी औषधांचा खर्च देखील मोठा आहे.