Money Management News : अलिकडच्या काळात पैशांचं योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. कारण दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसत आहे. आजारपणाचा, शिक्षणावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. त्यामुळं योग्य वेळी योग्य नियोजन केल्यास अडचण येत नाही. दरम्यान, आज आपण अशाच एका काम करणाऱ्या महिलेनं केलेल्या पैशांच्या नियोजनाबदद्लची माहिती पाहणार आहोत. 

Continues below advertisement

हरियाणातील गुरुग्राममधील एका घरकाम करणाऱ्या महिलेने तिच्या कमाईने लक्ष वेधून घेतले 

हरियाणातील गुरुग्राममधील एका घरकाम करणाऱ्या महिलेने तिच्या कमाई आणि आर्थिक व्यवस्थापनामुळे सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. गुरुग्राममध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने लिंक्डइनवर सांगितले की, त्याची घरकाम करणारी महिला दरमहा सुमारे 60000 रुपये कमावते आणि भरपूर बचत करते. घरकाम करणारी महिला पाच ते सहा घरांमध्ये काम करते. ती महिन्यातून तीन ते चार सुट्ट्या घेते. ती सकाळी 7 वाजण्यापूर्वी कामाला सुरुवात करते आणि केवळ गरजेनुसारच आपल्या कमाईचा वापर करते.

महिला आपल्या कमाईतून घराचा हप्ता (EMI) सुद्धा भरते 

ती महिला दरमहा अंदाजे 10000 रुपये घराचे भाडे देते. शिवाय, त्याची मुलगी एका खाजगी शाळेत शिकते, जिच्या शिक्षणाचा खर्चही ती उचलते. तसेच, तिने तिच्या गावात खरेदी केलेल्या 6 लाख रुपये किमतीच्या जमिनीचा हप्ता (EMI) देखील ती नियमितपणे भरते.

Continues below advertisement

अनावश्यक वस्तूंवर खर्च करण्याऐवजी आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित

ती महिला आपली कमाई चैनीच्या किंवा अनावश्यक वस्तूंवर खर्च करण्याऐवजी आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करते. त्याच्या मते, तिच्या मुलीचे शिक्षण आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षा ही तिची सर्वात महत्त्वाची ध्येये आहेत. ती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही हुशारीने पार पाडते.

 महिलेची तुलना कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांशी

मोलकरणीची कमाई आणि बचतीची तुलना कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या खर्चाच्या सवयींशी केली जात आहे. अनेक नोकरदार लोक कार, महागडी उपकरणे आणि जीवनशैलीच्या वस्तूंसाठी ईएमआय (EMI) घेतात. याउलट, ती महिला आपला खर्च नियंत्रणात ठेवून भविष्याची तयारी करत आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे तिच्याकडे आरोग्य विमा, कर्मचारी लाभ किंवा नोकरीशी संबंधित इतर आर्थिक सुरक्षा उपाययोजना नाहीत. असे असूनही, तिचे प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत.

दरम्यान, अलिकडच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणाव वाढली आहे. या महागाईच्या मानाने योग्य बचत करणे गरजेचे आहे. तसेच योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही गरजेचे आहे.