नवी दिल्ली : केंद्र सरकारनं ईडीचे संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल नवीन यांच्या सेवानिवृत्तीची तारीख 31 जुलै 2027 आहे. मात्र, केंद्र सरकारनं राहुल नवीन यांना एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता राहुल नवीन 13 ऑगस्ट 2027 पर्यंत ईडीचे संचालक म्हणून कार्यरत राहतील. राहुल नवीन यांचा ईडीतील दोन वर्षांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार होता, मात्र त्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.  केंद्रीय कार्मिक, लोक  तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाकडून यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीनं 1993 च्या आयआरएस सेवेतील अधिकारी राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. 

Continues below advertisement

निवृत्तीनंतर देखील पदावर राहणार

सरकारी आदेशानुसार राहुल नवीन यांचा कार्यकाळ 13 ऑगस्ट 2027 पर्यंत ईडीचे संचालक म्हणून वाढवण्यात आला आहे. राहुल नवीन यांच्या सेवानिवृत्तीची तारीख 31 जुलै 2027आहे. म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर काही दिवस राहुल नवीन ईडीचे संचालक म्हणून कार्यरत असतील  

केंद्र सरकानरं यापूर्वी राहुल नवीन यांना 30 मार्च 2026 ला प्रोफॉर्मा प्रमोशन दिलं होतं. केंद्रानं ईडीचे संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या राहुल नवीन यांना सीबीडीटीचे मुख्य आयकर आयुक्त म्हणून नियुक्त केलं आहे.  

Continues below advertisement

ईडीचे प्रभारी संचालक म्हणून काम  

राहुल नवीन यांनी 15 सप्टेंबर 2023 पासून ईडीचे प्रभारी संचालक म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं राहुल नवीन यांना 14 ऑगस्ट 2024 ला ईडीचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्त केलं होतं. आता दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असतानाच राहुल नवीन यांना ईडीमध्ये एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.