Bharat Gogavale : लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणांनी 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल गोगावले यांना केला होता, यावेळी ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात घेतला जाईल. 2100 रुपये देत असताना महिलांचे नवीन सर्व्हे केले जातील असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. यामध्ये कोणाकडे किती वाहणे आणि इतर वाहणे आहेत, या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत. मात्र, या त्रुटी तपासात असताना 1500 रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊ. सुरुवातीला हे पैसै देताना आमची घाई गडबड झाल्याचे गोगावले म्हणाले.
लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण, महायुतीने निवडणुकीच्या काळात महिलांना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले नाहीत. याबाबबत बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, 2100 रुपये देत असताना महिलांचे नवीन सर्व्हे केले जातील. यामध्ये कोणाकडे किती वाहणे आणि इतर वाहणे आहेत, या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत. मात्र, या त्रुटी तपासात असताना 1500 रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार असल्याचे गोगावले म्हणाले.
पालकमंत्री पदावरुन काही चांगल्या गोष्टी होणे बाकी
भरत गोगावले यांनी आज जिजाऊ मॉँसाहेब यांच्या जयंतीला उपस्थिती लावली. त्यावेळी बोलत होते. जिजाऊ मॉँसाहेबांचा वाडा सुधारित डागडुजी करण्याच्या कामाला वेग येईल असेही ते म्हणाले. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील गोगावले यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, रायगडला लवकरच न्याय दिला जाईल. पालकमंत्री पदावरुन काही चांगल्या गोष्टी होणे बाकी आहेत. त्या लवकरच पूर्ण होतील आणि याबाबत तिढा सुटेल असे गोगावले म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणे गरजेचे
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिस, एसआयटी आणि अन्य यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. परंतू, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणे गरजेचे असल्याचे गोगावले म्हणाले.
यामधील कोणी आणखी प्याधे आहेत का? त्यांचा शोध सुरु आहे. त्यांना मोक्का लावला जाईल असेही ते म्हणाले. उध्दव ठाकरे यांनी पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णया घेतला आहे. याबाबत विचारले असता गोगावले म्हणाले की, याबाबत प्रत्येकाची ज्याची त्याची इच्छा असते. ज्याच्या मनात येईल तसं ते करणार. परंतू आम्ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचे गोगावले म्हणाले.