Millionaire Formula : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. सुरक्षीत आणि चांगला परतावा देणाऱ्या विविध योजनांमध्ये लोक गुंतवणूक करत असतात. दरम्यान, तुमची जर कमी मिळकत असेल तरीही तुम्हाला करोडपती होता येतं का? तर याचं उत्तर होय असं आहे. कारण, आपण जर बचतीचं योग्य नियोजन केलं तर मोठा नफा मिळवू शकतो. आज आपण कमी काळात करोडपती होण्याच्या 15X15X15च्या फॉर्म्युल्याबद्दलची माहिती पाहणार आहोत.
पैशांची गुंतवणूक, कार्यकाळ आणि व्याज यामध्ये विभागणी
पैसा कमावला पण तो कसा वाढवायचा? आपले पैसे कसे व्यवस्थापित करावे? कुठून सुरुवात करायची? असे अनेक प्रश्न अनोकांसमोर असतात. यासाठी एक सुत्र आहे. करोडपती होण्यासाठी 15X15X15 हा एक चांगला फॉर्म्युला आहे. हा नियम पैशाला 3 भागांमध्ये विभागतो. गुंतवणूक, कार्यकाळ आणि व्याज. म्हणजे 15 हजार, 15 वर्षांसाठी, 15 टक्के व्याजाने हा नियम पैशाला 3 भागांमध्ये विभागतो. गुंतवणूक, कार्यकाळ आणि व्याज. म्हणजे 15 हजार, 15 वर्षांसाठी, 15 टक्के व्याजाने. जर तुम्ही या फॉर्म्युलाने गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. पण, यामागेही एक सूत्र आहे. चक्रवाढ व्याज गुंतवणुकीचे ते सूत्र आहे. पॉवर ऑफ कंपाउंडिंगचे सूत्र शिकवते की जर गुंतवणूक असेल तर ती दीर्घकालीन असावी.
15x15x15 मधून पैसे कसे कमवायचे?
गुंतवणूक – रु 15,000 (15,000 मासिक गुंतवणूक)
कार्यकाळ - 15 वर्षे
व्याज - 15 टक्के
एकूण मिळणारे पैसे - 15 वर्षांनी 1 कोटी रुपये
एकूण गुंतवणूक – 27 लाख रुपये
चक्रवाढ – 73 लाख व्याज उत्पन्न
10000 हजारांचे 1 कोटी कधी होणार?
जर तुम्ही म्युच्युअल फंडासोबत मासिक SIP करत असाल (मासिक SIP 1 कोटीसाठी) तर 10 हजार रुपयांपासून सुरुवात करा. साधारणपणे, म्युच्युअल फंडातील परतावा 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो. 20 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 24 लाख रुपये असेल. परंतु, यावर 74.93 हजार रुपये व्याज मिळणार आहे. याचा अर्थ, चक्रवाढ (चक्रवाढ व्याज गुंतवणूक) येथे काम करते. एसआयपीचे एकूण मूल्य 98.93 लाख रुपये होईल. तुम्हाला फक्त 74.93 लाख रुपये व्याज मिळाले आहे. आपण कुठेतरी गुंतवणूक करून जे काही कमावतो, ते पुन्हा गुंतवणे म्हणजे चक्रवाढ असते. यामध्ये तुम्हाला मूळ रकमेसोबतच व्याजही मिळते. कंपाउंडिंग हा तुमची गुंतवणूक वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.
महत्वाच्या बातम्या:
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती