एक्स्प्लोर

मुंबईत व्यवसाय चालू करण्याची सुवर्णसंधी! म्हाडातर्फे 173 गाळ्यांची होणार विक्री; जाणून घ्या लिलावाची संपूर्ण प्रक्रिया!

म्हाडातर्फे 173 अनिवासी गाळे विकण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया आता चालू झाली असून या गाळ्यांसाठी ऑनलाईन स्वरुपात बोली होईल.

मुंबई : मुंबईमध्ये व्यवसाय चालू करणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी चालून आली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (MHADA) अखत्यारीतील 173 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी 27 जून, 2024 रोजी संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे.

पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली

अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये 27 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 28 जून, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता https://mhada.gov.in व  www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत ई-लिलाव प्रक्रियेत करण्यात आला होता बदल

मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावामार्फत विक्रीसाठी 27 फेब्रुवारी, 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे ई-लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. बदललेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाचा दिनांक निश्चित करण्यात आला नव्हता. आता आचारसंहिता संपुष्टात आली असल्याने ई-लिलावाचा दिनांक व वेळ मंडळातर्फे निश्चित करण्यात आली आहे.

विक्रीसाठी वसतीनिहाय कोणत्या भागात किती गाळे? 

सदर ई-लिलावात मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतीनिहाय विक्रीसाठी उपलब्ध अनिवासी गाळ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. प्रतीक्षा नगर-शीव येथील १५ दुकाने, न्यू हिंदी मिल-माझगाव 2, स्वदेशी मिल-कुर्ला- 05, गव्हाणपाडा मुलुंड- 08, तुंगा पवई-03, कोपरी पवई-05, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व-01, शास्त्रीनगर गोरेगाव-01, सिद्धार्थ नगर गोरेगाव-01, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व- 17, मालवणी-मालाड- 57, चारकोप भूखंड क्रमांक एक- 15, चारकोप भूखंड क्रमांक दोन- 15 दुकाने, चारकोप भूखंड क्रमांक तीन -4, जुने मागाठाणे बोरिवली पूर्व -12, महावीर नगर कांदिवली पश्चिम –12 दुकाने बोलीसाठी उपलब्ध असतील.

प्रक्रियेत भाग घेण्यासाठी शेवटची मुदत काय?

या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे यांसाठी 1 मार्च, 2024 सकाळी 11 वाजेपासून ते दि. 06 जून, 2024 रोजी रात्री 11.59  वाजेपर्यंत मुदत देण्यात आली.  

हेही वाचा :

अनिल अंबानींची 'रिलायन्स पॉवर' शेअर कंपनी बाजारात सुस्साट, गुंतवणूकदारांची रांग; नेमकं कारण काय?

मोठी बातमी! अदानी समुहानं केली 'या' मोठ्या कंपनीची खरेदी, 10422 कोटींचा व्यवहार 

आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर, नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले : जयदत्त होळकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget