एक्स्प्लोर

Mhada : मोतीलाल नगर पुनर्विकासात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी,म्हाडाच्या सी अँड डीए मॉडेलद्वारे 143 एकरांचा कायापालट, म्हाडाला मिळणार 7 हजार घरे : मिलिंद बोरीकर

Mhada : मोतीलाल नगर पुनर्विकासात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी असून म्हाडाच्या सी अँड डीए मॉडेलद्वारे 143 एकरांचा कायापालट केला जाणार असल्याचं म्हाडाचे सीओ मिलिंद बोरीकर यांनी म्हटलं.

मुंबई  : गोरेगाव पश्चिम येथील बहुचर्चित मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी ठेवून पुनर्विकास केला जात आहे. सुमारे १४३ एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या या प्रकल्पासाठी म्हाडाने सी अँड डीए (कन्स्ट्रक्शन व डेव्हलपमेंट एजन्सी) मॉडेल स्वीकारले असून, या माध्यमातून रहिवाशांचे हक्क, आधुनिक सुविधा आणि नियोजनबद्ध पुनर्विकास यांचा समतोल साधण्यात येत असल्याचे प्रतिपादन म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी (सीओ) मिलिंद बोरीकर यांनी केले. 

एबीपी माझाच्या वतीने आयटीसी परळ येथे आयोजित ‘माझा इन्फ्रा व्हिजन’ कार्यक्रमात गृहनिर्माण विषयावरील सत्रात मिलिंद बोरीकर बोलत होते. म्हाडाच्या महत्वाकांक्षी सी अँड डीए मॉडेल अंतर्गत मोतीलाल नगर पुनर्विकास हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. 

मोतीलाल नगरमध्ये सध्या सुमारे ३७०० घरे आणि आस्थापना आहेत. त्यामध्ये सुमारे ३४०० निवासी आणि ३०० व्यावसायिकांचा समावेश आहे. पुनर्विकास करताना विद्यमान रहिवाशांना त्यांच्या हक्कानुसार योग्य क्षेत्रफळ मिळणे हा म्हाडाचा प्रमुख उद्देश असल्याचे बोरीकर यांनी सांगितले.

रहिवाशांना १६०० चौ. फूट क्षेत्राची घरे, म्हाडालाही मोठा गृहसाठा मिळणार  

शासन निर्णयानुसार मोतीलाल नगरमधील पात्र रहिवाशांना १६०० चौरस फूट कार्पेट (चटई) क्षेत्राची घरे तर व्यावसायिक आस्थापनांना ९८७ चौरस फूट कार्पेट क्षेत्राचे गाळे मिळणार आहेत. तसेच, या पुनर्विकासातून म्हाडाला सुमारे ६५०० ते ७००० घरे उपलब्ध होणार असल्याचे बोरीकर यांनी सांगितले. ही घरे म्हाडाच्या माध्यमातून लॉटरीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. त्यामुळे पुनर्विकासातून विद्यमान रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांसाठीही मोठ्या संख्येने परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे ३० लाख चौरस मीटर इतके असून यापैकी सुमारे ६ ते ६.५ लाख चौरस मीटर क्षेत्र पुनर्विकासासाठी, तर सुमारे ४ लाख चौरस मीटर बांधकाम म्हाडासाठी उपलब्ध होणार आहे. उर्वरित भाग विकासकाच्या विक्री घटकासाठी असेल, असेही बोरीकर यांनी सांगितले. 

म्हाडाची भूमिका नेमकी काय?

सी अँड डीए मॉडेलमध्ये म्हाडाची प्रमुख भूमिका जमीन मालकाची असली तरी प्रकल्पाचे नियोजन आणि देखरेखही म्हाडाच्याच नियंत्रणाखाली केली जाणार असल्याचे बोरीकर यांनी स्पष्ट केले. डीसीपआर नुसार रहिवाशांना त्यांच्या हक्काचे योग्य क्षेत्र उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण पुनर्विकास नियोजनबद्ध पद्धतीने होईल याची काळजी घेणे, हा म्हाडाच्या भूमिकेचा महत्त्वाचा भाग असल्याचे ते म्हणाले. 

तसेच, त्यामुळे विकासकाला केवळ प्रकल्प उभारणीची जबाबदारी देऊन म्हाडा बाजूला होणार नसून, संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन आणि देखरेख म्हाडाकडून केली जाणार असल्याचे बोरीकर यांनी सांगितले.

केवळ घरे नाही तर अनेक आधुनिक सुविधा, रहिवाशांचे जीवनमान उंचावणार!

मोतीलाल नगरचा पुनर्विकास केवळ जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती उभारण्यापुरता मर्यादित राहणार नसून परिसरातील सामायिक सुविधा, मोकळ्या व हरित जागा आणि विविध वयोगटांसाठीच्या सुविधांचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

लहान मुले, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक आणि नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असेल. त्यामुळे पुनर्विकासानंतर मोतीलाल नगरचा परिसर अधिक नियोजनबद्ध आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्यात येणार आहे. यामुळे येथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याकरीता म्हाडा काम करत असल्याचे मिलिंद बोरीकर म्हणाले. 

‘नागरिककेंद्रित पुनर्विकास’ हे म्हाडाचे उद्दिष्ट

मोतीलाल नगर प्रकल्पातून स्थानिक रहिवाशांचे हक्क, आधुनिक सुविधा, नियोजनबद्ध विकास व म्हाडासाठी मोठ्या प्रमाणात घरे, असा समतोल साधण्यात येत आहे. नागरिकांचे हित जपून पुनर्विकास करणे हेच म्हाडाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले.

माझा इन्फ्रा व्हिजन

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget