Meta Layoffs Doomsday : फेसबुकची मातृसंस्था मेटामधील (Meta Platforms) मोठ्या नोकरकपातीपूर्वी ऑफिसमध्ये अक्षरशः 'डूम्सडे'सारखे वातावरण होतं आणि अनेक कर्मचाऱ्यांनी मोफत उपलब्ध असलेले स्नॅक्स, कोल्ड्रिंक आणि चार्जर बॅगेत भरून नेले, असा धक्कादायक दावा कंपनीच्या माजी कर्मचारी एडेल वू (Adele Wu) यांनी केला आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे मेटामधील कामकाजाच्या वातावरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सन 2022 मध्ये मेटाच्या 18 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यात आली होती. त्या वेळी सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं होते. मेटाव्हर्स प्रकल्पातील मोठे नुकसान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच ऑटोमेशनमधील वाढती गुंतवणूक यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचं मानलं जातं.
Layoff Experience : 'डूम्सडे'सारखे वातावरण, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे सावट
एडेल वू यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिलं की, "पहिल्या मोठ्या नोकरकपातीच्या आदल्या रात्री ऑफिसमधील वातावरण भयंकर होतं. लोक मोफत मिळणारे स्नॅक्स, ड्रिंक्स आणि चार्जर आपल्या बॅगेत ठासून भरत होते."
मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा अत्यंत अनिश्चिततेचा काळ आहे, असं मतही एडेल वू यांनी व्यक्त केलं.
Meta Layoffs 2022 : 11 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
2022 मध्ये मेटाने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली. कंपनीच्या इतिहासातील ही पहिली मोठी नोकरकपात होती. त्यानंतरही विविध टप्प्यांमध्ये आणखी कपाती झाल्याचे वू यांनी सांगितलं. त्यांच्या मते, त्यांनी कंपनीतील शेवटच्या वर्षात चार ते पाच वेळा नोकरकपातीचा अनुभव घेतला.
Employee Reactions : सोशल मीडियावर इतर कर्मचाऱ्यांच्याही प्रतिक्रिया
वू यांच्या पोस्टनंतर अनेक विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांनीही आपले अनुभव शेअर केले. काहींनी कंपनीत प्रचंड चिंता आणि नाराजीचे वातावरण असल्याचं म्हटलं. एका यूजरने तर व्यवसायिक दौऱ्यावर असतानाच त्याच्या सहकाऱ्याला कामावरून कमी करण्यात आल्याचं सांगितलं.
AI And Metaverse : एआय आणि मेटाव्हर्समुळे बदललं कामाचं स्वरूप
मेटाने अलीकडच्या काळात आर्टिफिशल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि ऑटोमेशनवर अधिक भर दिला आहे. यामुळे कामाच्या पद्धतीत मोठे बदल झाले असून कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
ही बातमी वाचा:
