Mark Zuckerberg: मेटाचे (Meta) संस्थापक आणि सीईओ असलेल्या मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) हे सध्या त्यांच्या एका पोस्टमुळं चर्चेत आहेत. मार्कने फेसबुकवर आणि इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत मार्कच्या समोर गोमांस असलेली प्लेट ठेवली आहे. तसेच जगातील सर्वात चविष्ट गोमांस कसे तयार करत आहेत याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी गायींच्या संगोपाच्या छंदाबद्दल देखील माहिती दिली आहे. दरम्यान मार्कच्या या पोस्टवर अनेकांनी टीका केली आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. 


झुकेरबर्ग पाळतायेत गायी 


मार्क झुकरबर्गने यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ते काउई बेटावरील कोलाऊ रैंच (Ko'olau Ranch) येथे वाघ्यू आणि एंगस या जातींच्या गायी पाळत आहेत. त्यांनी सांगितले की ते फक्त ही गुरे पाळत नाहीत तर यामागं एक विशेष उद्देश आहे, अशा स्थितीत गायींना विशिष्ट प्रकारचे खाद्य दिले जात आहे. झुकेरबर्गची योजना जगातील सर्वोच्च दर्जाचे बीफ तयार करण्याची आहे. मी गायींच्या वाघ्यू आणि एंगस जातीचे संगोपन करत आहे. माझे ध्येय जगातील काही उच्च दर्जाचे गोमांस तयार करणे हे आहे. तसेच गायींना ड्रायफ्रुट्स आणि बिअर द्यायची आहे. यामध्यमातून जगातील सर्वोत्तम गोमांस बनवायचे असल्याचे मत मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केले आहे.


 



सर्वोच्च दर्जाचे गोमांस तयार करण्याचा प्रयत्न 


माझे ध्येय जगातील सर्वोच्च दर्जाचे गोमांस तयार करणे असल्याची माहिती मार्क झुकरबर्गने दिली आहे. गुरे वाघ्यू आणि एंगस आहेत. या गायी मॅकॅडॅमिया आणि बिअर पिऊन मोठे होतील. आम्हाला संपूर्ण प्रक्रिया स्थानिक आणि पूर्णपणे एकत्रित करायची आहे. प्रत्येक गाय दरवर्षी 5,000-10,000 पौंड अन्न खाते, ज्यासाठी अनेक एकर मॅकॅडॅमिया झाडे लावावी लागतील. माझ्या मुली मॅकॉची झाडे लावण्यास आणि आमच्या अनेक प्राण्यांची काळजी घेण्यास मदत करतात. आम्ही अद्याप प्रवासात लवकर आहोत आणि प्रत्येक हंगामात सुधारणा करणे मजेदार आहे. माझ्या सर्व प्रकल्पांपैकी हा एक सर्वात महत्वाचा आहे.


केवळ तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करा, PETA ची प्रतिक्रिया


मार्कच्या या पोस्टनंतर त्याच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. ही पोस्ट पाहून PETA ने  म्हटलं आहे की, केवळ तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करा. हा प्रकल्प प्राण्यांना मारणारा आहे. तुमच्या मुलांनाही याचा धक्का बसेल. इतरही अनेक उत्पादकावर तुम्ही काम करु शकता. प्राण्यांना वाचवणारे नवीन शाकाहारी पदार्थ तयार करणे, मानवी आरोग्य सुधारणे यासारखी कामे करु शकता असे पेटाने म्हटलं आहे.